Showing posts with label BJP. Show all posts
Showing posts with label BJP. Show all posts

25 December, 2019

भाजप महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता मिळवू शकेल?


२४ ऑक्टोबर २०१९ ला महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागले. त्यामध्ये महायुतीला १६१ जागा मिळून बहुमत मिळाले. जनादेशानुसार महायुतीची सत्ता स्थापन होणे अपेक्षित होते परंतु त्यानंतर जे सत्तानाट्य झाले ते महाराष्ट्रासह संपूर्ण देशाने पहिले. महायुतीतील एक महत्वाचा घटकपक्ष असलेला शिवसेना युतीतून फुटून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेला व मुख्यमंत्रिपद मिळवले. शिवसेनेच्या या खेळीने मुख्यमंत्रीपद मिळाले असले तरी भविष्यात या घटनेचे काय परिणाम होऊ शकतात हे येणाऱ्या निवडणुकांत कळेलच. जनादेशाचा स्पष्ट अर्थ महायुतीची सत्ता यावी असा होता परंतु फक्त भाजपला सत्तेतून बाहेर ठेवणे आणि मुख्यमंत्रीपद मिळवणे एवढ्या कारणासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार मतदारांवर थोपण्याचे परिणाम शिवसेनेला येणाऱ्या निवडणुकांत भोगावेच लागतील. पण या नव्या समीकरणांमुळे तात्पुरता भाजपची सत्ता गेली असली तरी भविष्यात मोठा लाभ त्यामुळे होऊ शकतो. किंबहुना यामुळे भाजपचे स्वबळावर महाराष्ट्र जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. ते कसे ते आपण बघूया. 

स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता मिळवण्याचे प्रयत्न भाजपने २०१४ सालीच सुरु केले होते. पण त्यात सर्वात मोठा अडसर होता तो शिवसेनेचा. कारण महाराष्ट्रात शिवसेनेची ओळख काँग्रेसविरोधी हिंदुत्ववादी पक्ष अशी होती. ज्यामुळे त्यांचा आणि भाजपचा मतदार हा समान होता. २०१४ विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात लढल्यावर हा मतदार विभागला गेला होता. २०१४ ला विरुद्ध लढूनही भाजपला २७.८१% मते मिळाली आणि सेनेला १९.३५% मिळाली. ही दोघांची मते मिळून ४७.१६% मते होतात जी काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध होती. २०१९ च्या निवडणुकीत भाजपला १ कोटी ४२ लाख मते मिळाली जी २५.७५% आहेत. आणि शिवसेनेला ९० लाख मते मिळाली जी १६.४१% आहेत. २०१४ पेक्षा २०१९ ला भाजपसेनेची मतांची टक्केवारी कमी झाली पण त्याचे खरे कारण बंडखोर उमेदवार आहेत. २०१९ ला इतर अपक्षांना १ कोटी २ लाख अशी भाजपनंतरची क्रमांक दोनची मते मिळाली जी १८.५% होतात. यामध्ये जवळपास ५०-७० लाख मते (११-१२%) ही भाजप-सेना बंडखोरांची आहेत जी योग्य खबरदारी घेतली असती तर भाजप-सेनेला मिळू शकली असती. आणि महायुतीच्या जागा २०० च्या पार गेल्या असत्या. पण जर-तरला आता काही महत्व नाही. 

परंतु आता शिवसेनेची काँग्रेसविरोधी हिंदुत्ववादी पक्ष अशी ओळख पुसली गेल्यामुळे शिवसेनेचा नाराज असलेला मतदार पूणपणे भाजपकडे जाणार आहे. हा मतदार सेनेला मिळालेल्या १६.४१% पैकी साधारणतः ३-३.५% असू शकतो. तसेच आता भाजप संपूर्ण २८८ जागांवर लढणार आहे त्यामुळे बंडखोरीची चिंता भाजपला नाही, जागावाटपाची कटकट असणार नाही. म्हणून २०१९ चे हे बंडखोर उमेदवार भाजपच्या गोटात जाऊन सहजपणे तिकीट मिळू शकतात. त्यामुळे २०१९ ला भाजप-सेना बंडखोरांना मिळालेल्या ११-१२% मतांपैकी ६-७% मते भाजप स्वतःकडे खेचून घेऊ शकतो. बंडखोरीची चिंता आता महाविकास आघाडीला करायची आहे कारण पुढे होणाऱ्या विधानसभेच्या (मध्यावधी?) निवडणुकांसाठी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करावीच लागेल. आणि तसे झाल्यास सेनेच्या वाट्याला १०० हुन कमी जागा येतील. त्यामुळे बंडखोरीची शक्यता खूप जास्त आहे. आणि जर योग्य जागावाटप न झाल्यामुळे सेनेनं आघाडी केली नाही तर ज्यांनी सत्ता एकत्र भोगली त्यांना आता एकमेकांचे पाय खेचत एकमेकांच्या विरोधातच लढावे लागेल. त्यामुळे मतदारांत बदनामी होईल ती वेगळी. हे सरकार जितके दिवस चालेल तितका त्यांच्यातला विसंवाद उघडकीला येईल आणि हे अस्थिर सरकार पडल्यावर अँटी इन्कबंसीचा फटका प्रामुख्याने मुख्यमंत्री असणाऱ्या शिवसेनेला जेवढा बसणार आहे तेवढाच किंवा त्यापेक्षा कमी प्रमाणात काँग्रेस-राष्ट्रवादीला बसणार आहे. त्यामुळे त्यांचीही १-१.५% मते भाजपकडे जाऊ शकतात. यांच्यातले जेवढे मतभेद उघडकीला येतील तेवढा फायदा भाजप करून घेण्याचा प्रयत्न करेल. 

भाजपला २०१९ला मिळालेली २५.७५% मते तसेच सेनेची नाराज ३-३.५% मते, बंडखोरांची ६-७% आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची १-१.५% या सर्व टक्केवारीची बेरीज केली तर येणाऱ्या निवडणुकीत भाजपची १०-१२% मते वाढून ती एकूण ३५-३७% मते होऊ शकतात. विधानसभा निवडणुकीत जेव्हा दोन पक्षांत प्रमुख लढत असते तेव्हा ४०% किंवा त्यापेक्षा जास्त मते मिळवणाऱ्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते. तसेच जेव्हा तीन पक्षांत प्रमुख लढत असते तेव्हा ३५% किंवा त्यापेक्षा जास्त मते मिळवणाऱ्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते. आणि जेव्हा चार पक्षांत प्रमुख लढत असते तेव्हा एखादा पक्ष ३०% किंवा त्यापेक्षा जास्त मते मिळवतो त्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते. आपण जर असे गृहीत धरले की महाराष्ट्रात आता भाजप, महाविकासआघाडी आणि वंचित, मनसे, अपक्ष (महाविकासआघाडी बंडखोर) अशी तिरंगी लढत होईल तर ३५-३७% मते मिळवून भाजप बहुमताने सत्ता स्थापन करेल असे दिसते. जागांच्या हिशेब लावला तर १% मते ४.२५-४.५ पट जागा बदलू शकतात. त्याहिशेबाने १०-१२% मतांच्या वाढीमुळे भाजपच्या ४३-५४ जागा वाढू शकतात. ज्यामुळे भाजपला एकूण १४८-१५९ जागा मिळू शकतात. 

शिवसेनेच्या जाण्यामुळे बिगरकाँग्रेसी स्पेस निर्माण झाली आहे ती पूर्ण व्यापण्याचा भाजप प्रयत्न करेल आणि आणि पूर्ण बहुमताने सरकार बनवण्याठीच भाजप मतदारांसमोर मते मागेल. पण ज्या चुका भाजपने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत केल्या जसे उमेदवार आयात करणे, आपल्याच पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणे, पक्षांतर्गत उमेदवार पाडणे असे प्रकार टाळले तर निश्चितच भाजपला स्वबळाने सत्ता मिळवण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. 

24 December, 2019

झारखंडमध्ये भाजपचा पराभव का?


नुकत्याच झारखंड राज्याचे निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. तिथे सत्ताधारी भाजप सरकारला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आदिवासींची मोठी लोकसंख्या असलेल्या झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून आदिवासी नसलेला व्यक्ती बसवण्याचा  प्रयोग करून चांगलीच किंमत भारतीय जनता पक्षाने मोजली आहे. नोव्हेंबर २००० मध्ये झारखंडची निर्मिती प्रदेशातील लोकांच्या हितासाठी केली गेली, विशेषत: आदिवासी जे राज्यातील लोकसंख्येच्या सुमारे २७ टक्के आहेत. आदिवासींच्या भावनेचा आदर करत भाजपने आदिवासी बाबूलाल मरांडी यांना पहिले मुख्यमंत्री म्हणून नाव दिले. नंतर मरांडीची जागा दुसरा आदिवासी नेता अर्जुन मुंडा यांनी घेतली. पण २०१४ मध्ये अखिल झारखंड स्टुडंट्स युनियन (एजेएसयू) यांच्याशी युती करून बहुमत मिळवल्यानंतर भाजपाने प्रथम बिगर आदिवासी मुख्यमंत्री म्हणून राघवर दास यांनी पदभार स्वीकारला.

सन २०१६ मध्ये संथाल परगणा टेनसी (एसपीटी) कायदा आणि छोटीगडपूर भाडेकरु कायदा (सीएनटी) मधील जमीन कायद्यात सुधारणा करून दास यांनी आदिवासींच्या भावना दुखावल्या. विरोधी पक्षांच्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत चर्चेविना ही घटना दुरुस्ती संमत करण्यात आली. राज्यपालांना दुरुस्ती मान्य करू नये म्हणून अनेक निवेदने देण्यात आली. या सुधारणांमध्ये विकास प्रकल्पांसाठी जमीन घेण्याचा प्रस्ताव होता. आदिवासींच्या जमिनींच्या संरक्षणासाठी हे दोन्ही कायदे तयार करण्यात आले होते. या विषयावर झारखंडमध्ये राज्यव्यापी निदर्शने झाली. चळवळ दाबण्यासाठी दासांनी सर्व पावले उचलली. निदर्शकांना महामंडळाच्या बस नाकारण्यात आल्या आणि पोलिसांना त्यांना रांचीत प्रवेश करण्यापासून रोखण्याच्या सूचना देण्यात आल्या. या दुरुस्तीविरोधात संपूर्ण विरोधी पक्ष, विशेषत: झारखंड मुक्ती मोर्चाने (जेएमएम) विधानसभेच्या आत आणि बाहेर निषेध केला होता. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात झामुमो-कॉंग्रेस-आरजेडी यांच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार हेमंत सोरेन स्वत: आदिवासी आहेत. आदिवासींच्या पाणी, जंगल आणि जमीनीचे (जल, जंगल आणि जमीन) हक्कांचे संरक्षण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अगदी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही त्यांचे संरक्षण करण्याचे वचन दिले होते.

झारखंड राज्यात नऊ आदिवासी जमाती आहेत ज्या निसर्गाची पूजा करतात आणि त्यांच्या संस्कृती, परंपरा आणि जंगलाशी भावनिकरित्या जोडलेल्या आहेत. आदिवासी आपली संस्कृती आणि लोकसंख्या संरक्षित करण्यासाठी सरना संहितेची मागणी करत आहेत. आदिवासींच्या जमीन, संस्कृती आणि परंपरा यांचे संरक्षण करण्याचे जेएमएमने आश्वासन दिले आहे, परंतु ते सरना संहिता कधी आणतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. हेमंत सोरेन यांचे वडील जेएमएमचे अध्यक्ष शिबू सोरेन यांनी एकदा संथाल परगणा भागातील आदिवासींच्या हक्कासाठी सावकारांच्या विरोधात लढा दिला होता. तो बाहेर राहणारे जमीनमालक आणि सावकारांमध्ये दहशत निर्माण करणारा होता. आणि त्यासाठी त्यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले होते. 

भाजपने झारखंडमध्ये अनेक आदिवासी नेत्यांना दुखावले ज्यांची तिथे आदिवासींच्या मनातील राग कमी करण्याची क्षमता होती. रघुवर दास सारख्या आदिवासी नसलेल्या मुख्यमंत्री करत अर्जुन मुंडासारख्या नेत्यापासून दूर जात भाजपने आदिवासींचा एक खरा नेता दूर केला. नंतरही अनेक जमीन सुधारणा करीत त्या सक्तीने लागू करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तेथील जनमत भाजप सरकार गेले होते. पण त्या जनमताला चुचकारण्याचे प्रयत्नही भाजप सरकारकडून झाले नाहीत. तसेच राज्यात गेल्या पाच वर्षात असेल किंवा निवडणूक प्रक्रियेदरम्यान असेल भाजपच्या केंद्रीय नेत्यांचा अनावश्यक हस्तक्षेप राहिला त्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व लवकरच या पराभवातून काहीतरी शिकेल  अशी अपेक्षा आहे. 

20 December, 2019

शिवसेनेचा वैचारिक गोंधळ



महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागून आता जवळपास दोन महिने होत आलेले आहेत. पण या कालावधीत मुख्यमंत्रीपदाच्या मोहात अडकलेल्या शिवसेनेला ज्या काही राजकीय तडजोडी कराव्या लागल्या त्यांचा उहापोह करणे गरजेचे आहे. कारण या सर्व तडजोडीचा तात्काळ काही परिणाम दिसत नसला तरी भविष्यात त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे जाणून घेणे गरजेचे असते. कारण नेते आज आहेत उद्या नाहीत पण पक्ष वर्षानुवर्षे टिकवायचा असतो त्यासाठी पक्षाचा समर्थक मतदार विचलित होईल, नाराज होईल असे घडू नये हे महत्वाचे असते. राजकीय महत्वाकांक्षा असणे गैर नाही, किंबहुना ती असायलाच हवी परंतु या महत्वाकांक्षेपायी आपल्या बहुसंख्य मतदाराला न रुचणारी भूमिका घ्यावी लागत असेल तर ती न घेण्यात राजकीय शहाणपण असते. पण काही वेळेला सत्तेच्या अथवा एखाद्या पदाच्या मोहात सापडलेले पक्ष आणि त्या पक्षाचे नेते आत्मघातकी ठरेल असे निर्णय घेतानाची अनेक उदाहरणे इतिहासात नमूद आहेत.

मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी नवी आघाडी तयार करण्यापर्यंत ज्या काही तडजोडी कराव्या लागल्या त्याची किंमत आधी शिवसेनेलाच द्यावी लागले ती केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा देऊन. तसेच शिवसेनेला भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही दलातूनही (NDA) बाहेर पडावे लागले. ते बाहेर पडले असले तरी काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीत (UPA) शिवसेनेचा प्रवेश झाल्याचे कुठेही दिसले नाही. ही आघाडी तयार करतांना किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला. हा किमान समान कार्यक्रम भाजपला सत्तेतून बाहेर ठेवणे एवढाच आहे. त्यात अनेक मुद्दे असले तरी शिवसेनेला सरकार चालवतांना "हिंदुत्व" आणि "प्रखर राष्ट्रवाद" हे दोन मुद्दे बाजूलाच ठेवावे लागतील हा मुख्य मुद्दा आहे. कारण शिवसेनेची ओळखच मुळात हिंदुत्ववादी पक्ष अशी आहे आणि तीच ओळख सत्तेसाठी बाजूला ठेवावी लागत आहे.
 पाकिस्तान बांगलादेशातील हिंदूंना भारतीय नागरिकत्व देणे, भारतातील बांगलादेशी घुसखोरांना हाकलवून लावणे, पाकिस्तानला धडा शिकवणे अशा अनेक मागण्या बाळासाहेब ठाकरेंच्या १९८५ पासूनच होत्या, किंबहुना याच मुद्द्यांमुळे भाजप आणि शिवसेनेची युती झाली होती. पण आता या गोष्टींचा सेना नेतृत्वाला विसर पडलेला दिसत आहे. कारण काँग्रेससोबत सत्तेत असताना या मुद्द्यांवर उघड समर्थ करणे जाड जाऊ शकते याची जाणीव सेना नेतृत्वाला आहे. याची चुणूक आपल्याला संसदेत 'नागरिकत्व सुधारणा विधेयक' आल्यावर दिसली. या विधेयकावर शिवसेनेने लोकसभेत सरकारच्या समर्थानात मतदान केले. परंतु नंतर काँग्रेसकडून महाराष्ट्र सरकार पडण्याची धमकी मिळाल्यानंतर मात्र राज्यसभेत शिवसेनेला लोकसभेतील भूमिकेच्या विरुद्ध भूमिका घेत राज्यसभेत सभात्याग करावा लागला. यावर पत्रकार परिषदेत त्यांनी काहीही खुलासा केला असला तरी मतदाराला अशा भूमिका पटत नाहीत आणि तो यांची नोंद करून ठेवत असतो. यापुढे संसदेत एन.आर.सी विधेयक, सामान नागरी कायदा विधेयक, पाकव्याप्त काश्मीर मुद्दा असे अनेक महत्वाची विधेयके येणार आहेत. तेव्हा मात्र शिवसेना नेतृत्वाची कसोटीच लागणार आहे. कारण हे मुद्दे बाळासाहेब ठाकरेंना प्रिय होते पण आता त्याच शिवसेनेला त्या विरोधात भूमिका घ्यावी लागेल असे वाटते. मतदार मात्र शांतपणे हे पाहत असतो. 

फक्त राष्ट्रीय पातळीवरच नाही तर राज्यपातळीवरही शिवसेनेचे मोठं नुकसान होऊ शकते. कारण महाराष्ट्रात शिवसेनेची ओळख काँग्रेसविरोधी हिंदुत्ववादी पक्ष अशी होती. ज्यामुळे त्यांचा आणि भाजपचा मतदार हा समान होता. २०१४ विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात लढल्यावर हा मतदार विभागला गेला होता. परंतु आता शिवसेनेची काँग्रेसविरोधी हिंदुत्ववादी पक्ष अशी ओळख पुसली गेल्यामुळे तो मतदार पूणपणे भाजपकडे जाणार आहे. त्याचे मोठे नुकसान शिवसेनेचे होणार आहे. तसेच पुढे होणाऱ्या विधानसभेच्या (मध्यावधी?) निवडणुकांसाठी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करावीच लागेल. आणि तसे झाल्यास सेनेच्या वाट्याला १०० हुन कमी जागा येतील. त्यामुळे बंडखोरीची शक्यता खूप जास्त आहे. भाजपचे तसे नाही त्यांना आता २८८ जागांवर लढायचे आहे, त्यांना आता जागावाटपाची कटकट असणार नाही. म्हणून हे बंडखोर उमेदवार भाजपच्या गोटात जाऊन सहजपणे तिकीट मिळू शकतात. आणि जर योग्य जागावाटप न झाल्यामुळे सेनेनं आघाडी केली नाही तर ज्यांनी सत्ता एकत्र भोगली त्यांना एकमेकांच्या विरोधातच लढावे लागेल. त्यामुळे मतदारांत बदनामी होईल ती वेगळी. हे सरकार जितके दिवस चालेल तितका त्यांच्यातला विसंवाद उघडकीला येईल आणि हे अस्थिर सरकार पडल्यावर अँटी इन्कबंसी चा फटका प्रामुख्याने मुख्यमंत्री असणाऱ्या शिवसेनेलाच बसणार आहे. त्यामुळे यांच्यातले जेवढे मतभेद उघडकीला येतील तेवढा फायदा भाजप करून घेण्याचा प्रयत्न करेल. शिवसेनेच्या जाण्यामुळे बिगरकाँग्रेसी स्पेस निर्माण झाली आहे ती पूर्ण व्यापण्याचा भाजप प्रयत्न करेल आणि आणि पूर्ण बहुमताने सरकार बनवण्याठीच भाजप मतदारांसमोर मते मागेल. पण यामुळे शिवसेनेचे जास्त नुकसान होणार आहे हे निश्चित. 

14 December, 2019

"बिहाइंड द सिन आणि बिटवीन द लाईन्स"

      महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सध्या वृत्तवाहिन्यांना मुलाखती देण्याचा सपाटाच लावला आहे. दररोज कुठल्या ना कुठल्या राष्ट्रीय किंवा मराठी वृत्तवाहिनीवर त्यांची मुलाखत प्रकाशित होत असते. त्यात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप जरी सारखेच असले तरी काही प्रश्नांची उत्तरे देवेंद्र फडणवीस थेटपणे देत नाहीत. या मुलाखतींमध्ये सर्वाधिक प्रश्न हे '८० तासांचे' अल्पकालीन सरकार, त्याआधी आणि त्यांनतर घडलेल्या घडामोडींवर असतात. शब्द तोलून मापून बोलण्यात पटाईत असलेले देवेंद्र फडणवीस हे काही घडामोडींबाबत मात्र "बिहाइंड द सिन आणि बिटवीन द लाईन्स" असे सूचक शब्द वापरतात. पण या पडद्यामागच्या घडामोडी नक्की कोणत्या आहेत? याचा शोध घेण्याची गरज शोधपत्रकारिता करणाऱ्या व एका घराण्याद्वारे पोसल्या जाणाऱ्या पत्रकारांना वाटत नाही. आपण मात्र बघू कि या घडामोडी कोणत्या असू शकतात. 

देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतमध्ये सांगितले कि २३ नोव्हेंबर ला सरकार स्थापन करण्यापूर्वी २-३ आधी अजित पवार त्यांना येऊन भेटले होते तोपर्यंत भाजप 'Wait and Watch' च्या भूमिकेत होता. २३ नोव्हेंबर च्या आधी २-३ दिवस म्हणजे साधारणतः २० नोव्हेंबर ला अजित आणि देवेंद्र यांची भेट झाली असणार. पण योगायोग असा आहे कि नेमकं त्याच दिवशी म्हणजे २० नोव्हेंबरला शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही दिल्लीत जाऊंन भेट घेतले होती. ती भेट शेतकरी प्रश्नावर होती असे पवार म्हणत असले तरी आजतागायत शेतकऱ्यांसाठी कुठलाही मोठा निर्णय झाला नसल्याने नक्कीच त्यात राजकीय चर्चा झालं असणार आहे. त्या भेटीं काय चर्चा झाली हे पवारांनी नुकत्याच एक मुलाखतीत सांगितले. ते म्हणाले कि मोदींनी "आपण राज्यात व देशात एकत्र काम करु" अशी इच्छा व्यक्त केली व मी स्पष्ट नकार दिला. या संदर्भात फडणवीसांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले कि शरद पवार हे त्या भेटीतील अर्धवट माहिती सांगत आहेत. म्हणजे त्या भेटीत नक्कीच खूप महत्वाच्या गोष्टी ठरल्या असतील. कारण त्याच दिवशी अजित पवार देवेंद्र फडणवीसांची भेट घेतात. याला योगायोग म्हणता येत नाही.

 देवेंद्र फडणवीस आणखी एक महत्वाचा खुलासा केलाय कि विधानसभेसाठी शिवसेनेसोबत युती करण्याची राज्यस्तरीय भाजपनेत्यांची इच्छा नव्हती परंतु भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मात्र युती तोडण्यास नकार दिला कारण त्याने जनतेत "भाजप लोकसभेसाठी युती करते पण विधानसभेसाठी युती तोडते" असा चुकीचा संदेश गेला असता असे सांगितले. याचा अर्थ युती करण्यास भाजप उत्सुक नव्हता आणि युती शिवसेनेकडूनच तुटावी असे भाजपला वाटत असणार आहे. भाजपची महाराष्ट्रात स्वबळावर सरकार स्थापन करण्याची इच्छा आहे ही गोष्ट लपून राहिलेली नाही आणि त्यांनी ते वारंवार बोलूनही दाखवले आहे. परंतु त्यासाठी युती तोडावी लागणार होती. त्यासाठी त्यांनी शरद पवार यांची मदत घेतली असू शकते. २४ ऑक्टोबरला विधानसभेचे निकाल लागल्यानंतर शिवसेनेकडून युती तोडण्याच्या हालचाली होऊ लागल्या ज्या भाजपला अपेक्षितच होत्या परंतु शिवसेना द्विधा मनस्थितीत असल्याने त्या हालचाली वेगवान होत नव्हत्या. शिवसेनेने भाजपसोडून काँग्रेससोबत जाऊन आघाडी करावी यासाठी भाजप आग्रही होती. परंतु २० नोव्हेंबर पर्यंत महाविकासआघाडीमध्ये खूप मतभेद असल्यामुळे सरकार स्थापन होत नव्हते. ते लवकर स्थापन व्हावे अशी भाजपची इच्छा होती म्हणून भाजप वाट पाहत बसला होता. पण ते स्थापन होत नसल्याने भाजप आणि राष्ट्रवादी टेन्शनमध्ये होते. म्हणून शरद पवार यांनी मोदींची २० नोव्हेंबर २०१९ ला भेट घेऊन हे आघाडी सरकार लवकर स्थापन होण्यासाठी एक नाटक करण्याचे योजले होते. मोदींनी त्याला संमती दिली. आणि शरद पवारांच्या सल्ल्याने अजित पवार भाजपकडे सरकार स्थापन करण्यासाठी आले.


२० नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर सकाळी ८ वाजेपर्यंत पडद्यामागे अनेक गोष्टी घडल्या. आणि शरद पवार मात्र "आपल्याला काहीच ठाऊक नाही" असे दाखवत राहिले. पण तेच तर या सरकारचे खरे सूत्रधार होते. आणि या भाजप-राष्ट्रवादी सरकारचा अपेक्षित परिणाम झाला. आणि आपले सर्व मतभेद तात्पुरता बाजूला ठेवत शिवसेना आणि काँग्रेस वेगाने जवळ आले. आणि ठरल्याप्रमाणे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला आणि आघाडी सरकार बनले. या पक्षांत मतभेद इतके आहेत की आज यांचे खातेवाटप जरी झाले असले तरी मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला घ्यायचे यावर अनेक मतभेद आहेत. आणि या विस्तारात जागा न मिळालेल्या नाराज आमदारांना भाजप गळाला लावेल अशी भीतीही या आघाडीतील पक्षांना वाटत आहे. कदाचित याच मतभेदांमुळे काही दिवसात राष्ट्रवादी या सरकारच्या बाहेर पडेल आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करेल. पण नुकसान मात्र शिवसेना आणि कॉग्रेसचे होणार आहे कारण आपल्या विचारधारा सोडून हे पक्ष फक्त सत्तेसाठी एकत्र आलेत हे जनता पाहते आहे. आणि नुकत्याच झालेल्या कर्नाटक पोटनिवडणूक निकालावरून तर हे स्पष्ट होते कि मोठ्या पक्षाला बाजूला ठेऊन फक्त सत्तेसाठी इतर पक्षांची संधीसाधू आघाडी जनतेला मान्य होत नाही व मतदार अशा आघाडीला येणाऱ्या निवडणुकीत नक्की धडा शिकवतात.

13 December, 2019

मोदींनी कलम ३७० कसे हटवले?

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी अत्यंत हुशारीने आणि गुप्तपणे जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० कसे हटवले ते क्रमाक्रमाने आपण पाहू .


टप्पा १. 
मेहबूबा मुफ्ती सरकारकडून भाजपने पाठिंबा काढून घेणे. ही घटना सर्वात महत्वाची होती जेणेकरून कलम ३७० हटवण्याला संमती देण्याचे अधिकार राज्यशासनाकडून राज्यपालांना मिळतील. त्यानंतर विधानसभा बरखास्त केली. व राज्यशासनाचे कार्यकारी अधिकार राज्यपालास हस्तांतरित झाले. 


टप्पा २.
राष्ट्रपतींनी कलम ३५६ अंतर्गत अधिकारांचा वापर करून २०१८ मध्ये जम्मू-काश्मीर मध्ये राष्ट्रपती राजवट लावून विधानसभेचे कायदे करण्याचे अधिकार संसदेकडे हस्तांतरित केले.

टप्पा ३.
यास आणखी मान्यता मिळवण्याकरिता आणि सुप्रीम कोर्टाकडून पुढे कुठलीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी २०१८ मध्ये अनुसूचित जाती-जमाती दुरुस्ती विधेयक टप्पा २ मध्ये  सांगितलेले अधिकार वापरुन मंजूर करण्यात आले आणि अपेक्षेनुसार कोर्टाने कुठलीही अडचण निर्माण केली नाही.

टप्पा ४.
आता अनुसूचित जाती-जमाती दुरुस्ती विधेयकास मान्यता देण्यात आल्यामुळे राज्यपालांची सत्ता निर्विवाद होते. १९५२ च्या अधिसूचनेचा उपयोग करून, संविधानसभेचे अधिकार राज्य विधानसभेला हस्तांतरित केले गेले. (खाली दिलेल्या नोटिफिकेशनमधील शेवटचे कलम पहा.)
आणि राज्य विधानसभेची सत्ता २०१८ पासून राज्यपालांकडेच होती.


- जून २०१८ मध्ये बीजेपीने जम्मू-काश्मीरची सत्ता सोडल्यानंतर सापळा रचला. आणि जेव्हा राज्यपालांना  वाटले कि आता कोणताही पक्ष किंवा युती सत्ता स्थापन करू शकत नाही तेव्हा त्यांनी विधानसभा विसर्जित केली. खरी गोम विधानसभा विसर्जित करण्यातच होती. 




वरील सर्व परिस्थिती तयार होईपर्यंत वेळ वाया घालवण्यासाठीच भाजपने सरकार तयार केले होते.

सारांश - 
१. आवश्यक परिस्थितीसाठी वेळ वाया घालवण्यासाठीच भाजपने सरकार तयार करणे. 
२. राज्यपालांचे अधिकार वाढीसाठी सरकारचे समर्थन काढणे. 
3. विवादित विसर्जन आणि राष्ट्रपती राजवट 
४. राज्यपाल सशक्त करण्यासाठी कलाम ३५६ चा वापर.
५. अनुसूचित जाती-जमाती दुरुस्ती विधेयक वापरुन सुप्रीम कोर्टाची संमती. 
६. १९५२ चा अधिनियम वापरून राज्यपालांना विधानभेचे अधिकार 
७. आवश्यक परिस्तिथी तयार झाली. 

- जम्मू-काश्मीरचे त्रिविभाजन का केले नाही, हे सांगण्यासाठी राजा हरिसिंह यांनी स्वाक्षरी केलेल्या सामीलनामा करारात जम्मू-काश्मीरचा उल्लेख आहे. म्हणून पीओके परत भारतात सामील होईपर्यंत 'जम्मू-काश्मीर' हे राज्य अस्तित्वात असणे आवश्यक आहे.

- भविष्यकाळात जर भारत पीओकेचा दावा करणार असेल तर मग या सामीलनामा कराराची आवश्यकता असेल. कारण त्यात या जम्मू-काश्मीरचा उल्लेख आहे. 


- खरी परीक्षा सरकारमधून माघार घेण्याच्या वेळी होती. सार्वत्रिक निवडणुकीच्या अवघ्या एका वर्षापूर्वीच भाजपाने माघार घेतली. आता त्यांना निवडणूक आयोगाने निवडणुकांची तारीख जाहीर होईपर्यंत थांबावे लागले. परंतु जम्मू-काश्मीरमधील पक्षांनी हे होण्यापूर्वी युती केली असती तर जम्मू-काश्मीर मध्ये सरकार स्थापन झाले असते. आणि भाजपची अडचण झाली असती. पण येथे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मस्त घोळ घातला.

- या लवकर विघटनानंतर आणखी एक समस्या निर्माण झाली. आता लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकासोबत जम्मू-काश्मीरच्या निवडणुका होऊ शकत होत्या. पण गृहमंत्रालयाने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आणि निवडणुका लांबणीवर पडल्या. त्यामुळे सत्ता अजूनही राज्यपालांकडे होती.

- हा खेळ मेहबुबाला समजला होता तसेच उमर अब्दुल्ला यांनाही कळला होता म्हणून ते सारखे मोदी सरकारवर टीकाही करत होते.  


- परंतु निवडणूक आयोगानेही सरकारला अपेक्षित असे केले. जम्मू-काश्मीरच्या निवडणुका जाहीर केल्या नाहीत. आता, २०१९ लोकसभा निवडणुकीपर्यंत राज्यपालांच्या सत्तेला कोणताही धोका नव्हता.

- आता अनुसूचित जाती-जमाती दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी योग्य वेळ आली होती. अशा प्रकारे, राज्यपालांची शक्ती स्थापित केली. या विधेयकात राज्यपालांची संमती हीच विधानसभेची संमती आहे असे मानण्यात आले. सुप्रीम कोर्टानेही ते स्वीकारले. आता सरकारच्या प्रत्येक निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणारे न्यायिक कार्यकर्ते सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या पाठीमागे लागून या विधेयकाबाबत पुनर्विचार करायचा आग्रह करू शकत नव्हते. जर त्यांनी त्याचा पाठपुरावा केला असता तर ते दलित विरोधी मानले जातील अशी भीती होती. म्हणून ते गप्प बसले. एकदा त्यांनी अनुसूचित जाती-जमाती दुरुस्ती विधेयक स्वीकारल्यानंतर ते परत जाऊ शकत नाहीत. हे न्यायिक कार्यकर्ते खऱ्या 'चाणक्यशी' लढा देऊ शकत नाहीत.

- सरकार तयार करण्यापासून ते योग्य वेळी माघार घेण्यापर्यंत, राज्यपालांना त्यांची शक्ती वैध करण्यासाठी अनुसूचित जाती-जमाती दुरुस्ती विधेयकाचा वापर करण्यापर्यंत भाजपाने मीडिया, विरोधी पक्ष, न्यायपालिका आणि टीकाकारांचा पुरेपूर वापर करून घेतला. या सगळ्यामागील थिंक टँक पाहून मी खरोखरच चकित झालो. प्रत्येकजण जम्मू-काश्मीरच्या भविष्यच्या विषयी बोलत होता मात्र कॉंग्रेस आणि पीडीपीमध्ये भाजप फाटाफूट करीत होता. शक्य तितका उशीर युती होण्यासाठी करणे हे त्यांचे एकमेव उद्दीष्ट होते. जरी मेहबुबाला ओमरसोबत युती हवी होती, तरीही भाजपने त्यांची संख्या कमी असल्याचे निश्चित केले.


- भाजपचा आणखी गट ह्या युतीला उशीर करण्यासाठी कामाला लागला होता. 


- आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, कलम ३७० काढलं गेलेल नाही, तर ते शक्तीहीन बनविलं गेलं आहे. त्यामुळे कोणतीही घटनादुरुस्ती केली गेली नाही.

- सर्वात महत्वाची घटना 'गहाळ फॅक्स प्रकरण' ही होती. यामुळे कलम ३७० च्या शेवटावर  शिक्कामोर्तब झाले.


- भाजपने सरकार स्थापन केले नसते तर आमदाराची बंडखोरी अशक्य झाली असती. यामुळे त्यांना पीडीपी आणि एनसीमध्ये फूट पाडण्यास मदत झाली. भाजप-पीडीपी युतीसाठी लोकांनी त्यांना शिव्या दिल्या आजही देतात पण ते करणे किती आवश्यक होते हे आज कळते.

- १९५२ च्या अधिसूचनेबद्दल काही लोक विचारत आहेत. १९५२ मध्ये राष्ट्रपतींची अधिसूचना विधानसभा नसल्यामुळे राज्य विधानसभेच्या संमतीशिवाय घटनासमितीच्या सम्मतीने मंजूर करण्यात आला. हा एक अपवाद १९५२ मध्ये निर्माण केला गेला होता त्याचा आज मोदींनी उपयोग केला. आज घटना समिती अस्तित्वात नसल्याने तिचे अधिकार विधानसभेला आणि विधानसभाही  अस्तित्वात नसल्याने तिचे अधिकार थेट राज्यपालांना मिळाले. राज्यघटनेचे कलम ३५६ थेट जम्मू-काश्मीरला लागू होत नाही. त्यासाठी आधी जम्मू-काश्मीरच्या घटनेतील कलम ९२ च्या अंतर्गत राज्यपाल राजवट ६ महिन्यांकरीता लागू होते आणि नंतरच राष्ट्रपती राजवट लागू शकते.

- एकदा पीडीपी आणि एनसी दोघेही मोदी सरकारला राष्ट्रपती राजवट घोषित करण्यात रोखू शकले नाहीत, तेव्हा पाकिस्तान चित्रात दिसू लागला. मार्च मध्ये निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेपूर्वी कलम ३७० काढले गेले असते परंतु पुलवामा हल्ल्यामुळे मोदीजींना ते थांबवावे लागले.

- पाकिस्तानला दोन गोष्टींची अपेक्षा होती.


१. मोदीजी निवडणुकांबद्दल विचार करतील आणि पुलवामानंतरही कलम ३७० काढतील. पण त्यामुळे कलम ३७० काढण्याचे आंतरराष्ट्रीयकरण झाले असते. मोदीजींनी कलम ३७० संसदेचा वापर करून काढायचे ठरवले. जर मोदींनी तसे केले नसते तर पाकिस्तानला कलम ३७० काढण्याचे आंतरराष्ट्रीयकरण करण्यात यश आले असते.
काश्मीरमध्ये कोणत्याही सर्जिकल स्ट्राईकसाठी पाकिस्तान तयार होता पण बालाकोटला हवाई हल्ले झाले जे  पाकिस्तानला अपेक्षित नव्हते. मोदींनी पाक प्रदेशात जास्त खोलवर हल्ला करण्याची मोठी जोखीम पत्करली  जेणेकरुन पाक मागील वेळेप्रमाणे हे हल्ले नाकारू शकत नाही. भारत इतक्या खोलवर हल्ले करेल याचीही पाकिस्तानला अपेक्षा नव्हती.

२. पाकिस्तानची दुसरी अपेक्षा होती की मोदीजी ती पार करणार नाहीत. मागच्या वेळेपेक्षा मोदीजी कमी जागा जिंकतील अशी त्यांची अपेक्षा होती. होय, मोदीजी परत आले आणि त्याचबरोबर ते आणखी मोठा जनादेश घेऊन परत आले. मोदीजी कलम ३७० हटवणार आहेत हे पाकिस्तानला आधीच समजले होते पण वेळ घालवण्यापलीकडे दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हता. ते उशीर करण्यात यशस्वी ठरले पण ते आंतरराष्ट्रीयकरण करण्यात अपयशी ठरले. पाकिस्तानने कलम ३७० वाचवण्यासाठी मोठा राजकीय धोका पत्करला. परंतु त्याचा काही फायदा झाला नाही.


- राजकारणापेक्षा देशाला महत्व देण्याचा शहाणपणा मोदीजींनी केली. ५ ऑगस्ट रोजी, जेव्हा कलम ३७० काढून टाकले गेले, तेव्हा पाकिस्तानमध्ये ट्विटर युद्धाच्या जोरावर ते कोणतेही आंतरराष्ट्रीय प्रेस आकर्षित करू शकले नाहीत. मला वाटते हा सर्वात कठीण भाग होता. तो एक प्रचंड धोका होता, परंतु त्याचा फायदा देशाला झाला. सार्वत्रिक निवडणुकांसह जम्मू-काश्मीरच्या निवडणुकाही होतील अशी पाकिस्तानलाही अपेक्षा होती. परंतु बालाकोटच्या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांत तणाव इतका वाढला की ते अशक्य झाले.

- तर, लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेसह राष्ट्रपती राजवट काढून टाकण्याच्या प्रत्येक आशेचा मृत्यू झाला. मेहबूबा मुफ्ती अंतिम मुख्यमंत्री ठरल्या. ते विलंब करण्यास सक्षम होते परंतु त्या विलंबाने काही फायदा झाला नाही कारण मोदी केवळ सत्तेवर आलेच नाही तर राज्य विधानसभेच्या निवडणुकादेखील निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकल्या. तसेच, मोदीजी हटविण्यासह पुढे जाण्याच्या जाळ्यात अडकले नाहीत.

हा लेख @AayushNarayan3 यांच्या लेखाचे मराठी भाषांतर आहे 

06 December, 2019

आर्थिक मंदी रोखण्याच्या मोदींच्या रणनीतीबद्दल माझे मत


         जर भारत ग्लोबल पॉवर बनू इच्छित असेल आणि अमेरिका आणि चीनशी स्पर्धा करू शकला असेल तर पुढील 10 वर्षांत आपण नाममात्र जीडीपी वाढीच्या 12% दराने वाढण्याची गरज आहे. तरच आपण मध्यम उत्पन्न असणारा देश होऊ शकतो आणि जागतिक शक्तींशी स्पर्धा करू शकतो. तसे होण्यासाठी आपल्याला अनेक गंभीर संरचनात्मक सुधारणांची आवश्यकता आहे.
मोदींचा पहिला कार्यकाळ समाजवादी आर्थिक धोरणांविषयी होता. जीएसटी (समस्या असूनही), आयबीसी आणि प्रमुख इन्फ्रा बूस्ट वगळता मोदींची सर्व धोरणे मुद्रा, प्रसाधनगृह, गृहनिर्माण, आयुष्यमान आणि पीएमकिसन या निसर्गात डाव्या विचारांचे होते. परंतु मोदी नि: शुल्क बाजार भांडवलदार आहेत. जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा ते म्हणत की, "भारताला विकसित होण्यासाठी अनेक गंभीर संरचनात्मक सुधारणांची आवश्यकता आहे." मोदींचा पहिला कार्यकाळ समाजवादी आर्थिक धोरणांविषयी होता. जीएसटी वगळता (समस्या असूनही), आयबीसी आणि प्रमुख इन्फ्रा बूस्ट वगळता मोदींची सर्व धोरणे मुद्रा, प्रसाधनगृह, गृहनिर्माण, आयुष्यमान आणि पीएमकिसन यांच्यासारख्या डाव्या विचारसरणीच्या होत्या. पण स्वभावानुसार मोदी हे एक मुक्त बाजार भांडवलदार आहेत. जेव्हा ते मुख्यमंत्री होते, ते ओपिनली म्हणायचे, "पीएसयू का जनम मरने के लिए है होता है".  ते भांडवलदारासारखे आले. पण त्यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात समाजवादीसारखे मार्गक्रमण केले.

परंतु मी खात्रीने सांगू शकतो की त्यांचा पहिला कार्यकाळ खात्रीसाठी होता की ते दुसर्‍या टर्मसाठी पुन्हा सत्तेवर येतील. मोदींना माहित आहे की पब्लिक माइंडसेट निसर्गतः समाजवादी आहे. लोकांचे मत संशयासह सुधारणांकडे आहे. काही लोक #SaveBPCL #SaveAirIndia हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. तसेच बुलेट ट्रेनला होणारा विरोध पहा. मूलभूत आर्थिक जागरूकता नसल्यामुळे सामान्य लोक खासगीकरण, एफडीआय वगैरेला विरोध करतात. मोदी वाजपेयींच्या चुकांवरून शिकले. त्यांनी भाजपला आणि देशाला २०१९ मध्ये २००४ सारख्या परिस्थितीपासून वाचवले आणि समाजवादी धोरणांद्वारे त्यांनी कायमस्वरुपी भाजपाची व्होटबँक तयार करण्यावर भर दिला. त्यांच्या समाजवादी योजनांचे लाभार्थी आता भाजपाचे कायम मतदार आहेत. हे मतदार आता पुढच्या दहा वर्षांत किमान विरोधी पक्षाच्या प्रचारामुळे प्रभावित होणार नाहीत.

आता दुसऱ्या कार्यकाळात मोदींनी २०२५ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर जीडीपीचे आणि २०३० पर्यंत १० ट्रिलियन डॉलर जीडीपीचे  लक्ष्य ठेवले आहे. याचा अर्थ असा की नाममात्र जीडीपी वाढीचा दर १४% असेल (चलनवाढीचा दर < ६ टक्के राहील आणि एक्सचेंज रेटमध्ये कोणताही बदल होणार नाही असे गृहीत धरले आहे). तसे होण्यासाठी आपल्याला फ्री मार्केट कॅपिटलिझमच्या दिशेने मोठे बदल होणे आवश्यक आहे. बीपीसीएल आणि एअर इंडियाच्या खासगीकरणाच्या निर्णयापर्यंत आणि कॉर्पोरेट टॅक्स कट निर्णयापर्यंत ते साध्य होण्याची आशा नव्हती. परंतु आता असे दिसते की मोदी सरकार हे कडू औषध पिण्यास तयार आहे. आता, खालील सुधारणेचे अनुसरण करणे आवश्यक आहे -

१. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे सरकारीकरण - एसबीआय सोडून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील सरकारी भागभांडवल ३०% पर्यंत कमी करा. १९९७ पासून अनेक तज्ज्ञ समितीच्या अहवालांनी हे सुचवले आहे. यशवंत सिन्हा आणि चिदंबरम दोघांनीही असे काही प्रसंगी सांगितले होते की आम्हाला ते करायला आवडेल पण तसे करण्यास आमच्याकडे बहुमत नाही.

२. सर्व नॉन स्ट्रॅटेजिक पीएसयूचे खाजगीकरण व्यवसाय करणे हा सरकारचा व्यवसाय नाही. हिंदीमध्ये एक म्हण आहे - ' जहाँ राजा व्यापारी, वहाँ प्रजा भिकारी'. या पांढऱ्या हत्तींपासून सुटका करणे चांगले.

३. भूमि अधिग्रहण सुधारणांचा मोदींनी २०१४ मध्ये प्रारंभी प्रयत्न केला, पण २०१५ मध्ये “सूट बूट की सरकारच्या” विरोधकांच्या टीकेनंतर आणि दिल्ली आणि बिहार विधानसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर त्यांनी हे सोडून दिले.

४. नेमणे आणि हटवणे धोरणासह कामगार सुधारणा.

५. कृषी सुधारणे म्हणजे एपीएमसी भंगार करून कृषी बाजारपेठा मोकळे करणे.

६. औद्योगिक कर कमी करण्यासह प्रत्यक्ष कर संहिता. याने Supply Side ला प्रोत्साहन दिले जाते. Dimand Side ला बूस्ट देण्यासाठी आता आम्हाला वैयक्तिक आयकर दर कमी करण्याची आवश्यकता आहे. डीटीसी त्याची काळजी घेईल.

७. जीएसटी प्रक्रियेचे सरलीकरण (६०% काम प्रलंबित) आणि जीएसटी दरांचे तर्कसंगतकरण.

८. निर्यातीला चालना देण्यासाठी व्यवसाय अनुकूल देशांसह मुक्त व्यापार करार.

९. पायाभूत सुविधांना अतिरिक्त मेजर बूस्ट.

१०. न्यायिक सुधारणा. इत्यादी

निराकरणे नवीन नाहीत. पण अंमलबजावणी ही समस्या आहे. हे सर्व उपाय अँटी फार्मर्स, अँटी कॉमन मॅन, अँटी स्मॉल बिझिनेस म्हणून समजले जातात. लोक यास श्रीमंत लोकांकडे देश विक्री म्हणून संबोधतात.

बहुतेक सुधारवादी प्रधानमंत्री PV नरसिंहराव आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी अर्थव्यवस्थेत अत्यंत चांगल्या सुधारणा करत असूनही निवडणुका गमावल्या. त्यावेळी PV नरसिंहराव यांच्यावरही देश विकल्याचा आरोप होता. प्रत्येकाला माहित आहे की हे करणे आवश्यक आहे परंतु जनतेच्या प्रतिक्रियेच्या भीतीने राजकारणी हे करण्यास घाबरत होते. पण मोदींनी लक्ष्य ठेवले होते. म्हणून, त्यांनी ते करणे आवश्यक आहे. त्याला सुधारणेची कल्पना देशाला विकायची आहे. हे करणे आवश्यकी आहे हे त्यांनी लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे. नोटबंदीही त्यांनी याच मार्गाने केली. याच मार्गाने ते अर्थव्यवस्थेत सुधारणा करू शकतात. ज्याला खूप जास्त लोकांची मान्यता आणि विश्वासार्हता आहे. तोच ह्या सुधारणा करू शकतो.

मोदींनी सत्ता आल्यानंतर लगेचच कलम ३७० का रद्द केला आणि २०२३ मध्ये का नाही? १ वर्षात हे सर्व राम मंदिर, UCC, NRC, CAB, लोकसंख्या नियंत्रण कायदा का? २०२४ च्या निवडणुका जिंकण्यासाठी या सर्व बाबींवर वर्षभरापूर्वी कारवाई केली गेली असती. परंतु हे मुद्दे आता हाती घेण्यात आले आहेत. या मुद्द्यांमुळे राजकीय भांडवल आवश्यक आहे. या समस्येमुळे, लोक सुधारणांकडे दुर्लक्ष करणार नाहीत. या भावनिक मुद्द्यांमुळे, राजकीय भांडवलामुळे राजकीय नुकसानीचे प्रमाण कमी होईल. मोदी हुशार आहेत. त्यांना हे माहित आहे.

सध्याचे मोदी सरकार कॉर्पोरेटसारखे काम करीत आहे जिथे मोदी पूर्णपणे अर्थव्यवस्था व सुधारणांवर भाग घेतील. आणि अमित शहा भावनिक मुद्द्यांचा सामना करतील आणि राजकीय भांडवल निर्माण करतील. सुधारणेची कल्पना विकण्यासाठी आपल्यास एक संकट असणे आवश्यक आहे. संकटाशिवाय तुम्ही मतदारांना सुधारणे विकू शकत नाही. म्हणूनच मोदी गप्प आहेत आणि संकट आणखी वाढवू देतात जेणेकरुन 'आपत्ती निवारण'च्या नावाखाली या सर्व सुधारणांची विक्री होऊ शकेल. माझ्या प्रामाणिक मते, सध्याचे संकट हे सर्व सुधारणांचे औचित्य सिद्ध करण्यासाठी मोदी सरकारचे स्वत: नेच निर्माण केलेले संकट आहे. मोदी जाणीवपूर्वक स्वतःवर अर्थव्यवस्थेबाबत टीका होऊ देत आहेत. विरोधकांना आणि ट्रोल्सना, मोदींना अर्थव्यवस्थेबद्दल काही समजत नाही असे सांगू देत आहेत, त्यांच्या सरकारची चेष्टा करू देत आहेत. परंतु त्याच्याकडे बॅकअप योजना आणि सुधारणांचे ब्लू प्रिंट आहे. त्यासाठी त्यांनी एक टीम कामाला लावली आहे. माझ्यामते अरविंद पंगारिया, ए. विरमणी, जगदीश भगवती, सुरजित भल्ला हे पडद्यामागे मोदींसाठी काम करत आहेत. हे त्या टीमचे सदस्य कदाचित अधिकृत नसतील. 

मला वाटते/आशा आहे की मोदी सरकार 'Soviet scorched Earth tactic ' चा वापर भारतीय अर्थव्यवस्थेबाबत करीत आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये सोव्हिएत युनियनने जवळजवळ ६ महिने प्रचंड माघार घेतली आणि सोव्हिएत प्रांतातील वेह्रमॅक्टपर्यंत प्रचंड भूमी स्वीकारली. माघार घेताना सोव्हिएत युनियनने त्यांची स्वतःची पिके, घरे, निवारा, कारखाने, रेल्वे मार्ग, मुळात अक्षरशः सर्व काही जाळले. म्हणून, बर्लिन ते कुर्स्क पर्यंत पुरवठा लाइन राखणे अशक्य होते, आणि एकदा हिवाळा आला की, वेहरमॅच्टला चिखल व बर्फाचे ढिगारे साठवण्यात आले, त्याच क्षणी स्टालिनने हिवाळी हल्ले सुरू केले आणि युद्धाची दिशा बदलली.

माझ्यामते भारतीय अर्थव्यवस्थेबाबतही तेच घडेल. २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीत "कोणताही पर्याय उपलब्ध नाही. (TINA Factor)" असे सांगून भारतात मुक्त अर्थव्यवस्थेची सुरुवात होईल. म्हणूनच मोदी अर्थव्यवस्था कोलमडू देत आहेत आणि मला वाटते की हे काम या महिन्यापर्यंत राहील.. काही दिवसात पंतप्रधानांना ८ नोव्हेंबर २०१६ सारखे देशाला संबोधित करणाऱ्या भाषणाची अपेक्षा करू शकतो. जर आपल्याला २०२५ पर्यंत आपली ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करायची असल्यास अशा प्रकारच्या किमान काही सुधारणांची घोषणा करण्याची शेवटची तारीख १ फेब्रुवारी २०२०, अर्थसंकल्प दिवस ही आहे. माझ्यामते, मोदींनी इतर उपायांसह बँकांचे खासगीकरण जाहीर करावे.

२३ डिसेंबर २०१९ रोजी PV नरसिंहराव यांची पुण्यतिथी आहे. त्याचदिवशी त्यांना आदरांजली देतांना मोदी त्यांना श्रद्धांजली म्हणून भारतरत्न जाहीर करतील. ज्याप्रमाणे मोदींनी गांधी व सरदार पटेल यांचा वारसा कॉंग्रेसचाकडून हिसकावून घेतला आहे त्याचप्रमाणे मोदी कॉंग्रेसमधील PV नरसिंहराव यांचा वारसा हिसकावून घेतील. म्हणून, १ फेब्रुवारी २०२० रोजी किंवा त्यापूर्वी मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा जाहीर होण्याची अपेक्षा आहे. कम्युनिस्ट कामगार संघटना, व्यापारी संघ, बँक संघटना, शेतकरी संघटना इत्यादींकडून मोठ्या प्रमाणात आवाज ऐकू येईल. बंद, मोर्चा, निदर्शने, रास्तारोकोसाठी कदाचित ते रस्त्यावर येतील. पण भाजपच्या सर्व समर्थकांना अशी विनंती आहे की तुम्ही अशा सरकारच्या सर्व उपाययोजनांची माहिती नातेवाईक, मित्र, सहकारी इत्यादींना द्या. त्यांना या सुधारणांच्या अनुकूल करा. २०२०-२१ या वर्षात भाजपला अल्प मुदतीचा राजकीय किंमत मोजावी लागणार आहे. परंतु २०२२ नंतरच्या काळात मोठा राजकीय फायदा भाजपाला होणार आहे.

हा लेख @accountantvarun यांच्या लेखाचे  मराठी भाषांतर आहे.