17 December, 2019

नागरिकत्व सुधारणा कायद्यास विरोध कशासाठी?


नागरिकत्व सुधारणा कायद्यास देशाच्या काही भागात तीव्र विरोध आहे. हा विरोध करताना मात्र शांततेपूर्ण मार्गाचा अवलंब न करता जाळपोळ, हिंसाचार, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले जात आहे. काँग्रेस सहित अनेक डाव्या पक्षांतर्फे या विरोधाला आणखी खतपाणी मिळत आहे. काही विद्यापीठांमध्ये अनेक विद्यार्थीसुद्धा या हिंसक विरोध प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. कोण आहेत ही लोकं? यांना नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल काय माहिती आहे? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका म्हटल्याप्रमाणे या ही लोकं कोण आहेत कपड्यांवरूनच कळते. पण या कायद्याचे महत्व समजून न घेता अनावश्यक मागण्या सरकारसमोर मांडून त्या पूर्ण होतील या गैरसमजातून या लोकांनी बाहेर येणे गरजेचे आहे. तसेच गृहमंत्री अमित शहांनी संसदेत बोलताना या कायद्यामुळे देशातील कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगला देशातून भारतात आश्रयाला आलेल्या सहा समुदायांच्या लोकांना सामावून घेण्यासाठी असलेल्या या कायद्याबाबत अनेक संभ्रम आणि समज-गैरसमज आहेत. तसे पहिले तर, आज म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांना इतर इस्लामिक देश आपलेसे करण्यास तयार नाहीत. बांग्लादेश, इंडोनेशिया, मलेशिया हे इस्लामी देश त्यांना शरण देत नाही. पण भारत आपल्या आश्रयाला आलेल्या अल्पसंख्याक समुदायांना सामावून घेण्याचा मोठेपणा दाखवत आहे, असा संदेश यातून जगाला जाणार आहे. असा संदेश जाण्याच्या भीतीनेच बांग्लादेशच्या पंतप्रधानांनी भारतातील बांगलादेशी घुसखोरांना परत सामावून घेण्याची तयारी दर्शवली आहे. हे या कायद्याचे एक मोठे यशच आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाने या कायद्यात काय बदल होणार आहेत हे  जाणून घेणे महत्वाचे आहे. या विधेयकामुळे प्रामुख्याने १९५५ च्या भारतीय नागरिकत्व कायद्यात सुधारणा होणार आहे.  त्यामुळे 1955 च्या कायद्याच्या तरतुदी काय आहेत हे समजून घेतले पाहिजे. या कायद्यानुसार, भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी चार पूर्वअटी पूर्ण करणे गरजेचे आहे. भारतीय राज्यघटनेतील नागरिकत्वासंदर्भातील तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत.

  1. त्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला पाहिजे,
  2. त्या व्यक्तीच्या पालकांचा जन्म हा भारतात झालेला पाहिजे.
  3. त्याची नोंदणी करून देशाचे नागरिकत्व मिळवता येते.
  4. वाईट परिस्थितीत जे लोक भारतामध्ये आले आहेत आणि कमीतकमी ११ वर्षे ते भारतात राहत आहेत अशा लोकांना नागरिकत्व देता येते. 
नागरिकत्व कायद्यात काही पहिल्यांदा सुधारणा होत नाही आहेत. यापूर्वी बऱ्याचदा सुधारणा होऊन विविध लोकांना, समुदायांना वेळोवेळी नागरिकत्व देण्यात आले आहे. नुकत्याच मंजूर झालेल्या विधेयकामध्ये 2 मुख्य तरतूदी आहेत. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश या भारताच्या तीन शेजारच्या देशातील हिंदू, शीख, जैन, बुद्धीस्ट, पारशी आणि ख्रिश्चन या सहा समुदायांपैकी जे लोक भारतामध्ये आलेले आहेत आणि जे गेल्या अनेक दशकांपासून भारतात राहाताहेत त्यांना भारताचे नागरिकत्व बहाल करण्याची तरतूद या नव्या कायद्यामध्ये आहे. दुसरी मुख्य तरतूद म्हणजे, 1955 च्या नागरिकत्व कायद्यातील वास्तव्यमर्यादेची 11 वर्षांची अट सैल करुन ती आता 6 वर्षांवर आणलेली आहे. या दोन सुधारणा नव्या कायद्यात प्रस्तावित केलेल्या आहेत. 
ह्या कायद्यामध्ये दोन संकल्पना असून त्यातील फरक समजून घेणे महत्वाचे आहे. हा कायदा निर्वासितांपेक्षा देखील आश्रितांच्या संदर्भातील आहे. निर्वासित (Refugees)आणि आश्रित (Asylum ) यांच्यात फरक आहे. स्वतःच्या देशात अमानवी छळाचा सामना करावा लागल्याने भारतात आश्रय मागणारे हे आश्रित आहेत; तर निर्वासित म्हणजे भारतात बेकायदेशीरपणे घुसखोरी केलेले आणि ज्यांच्याकडे कोणतेही अधिकृत कागदपत्रेही नाहीत असे लोक. यातील प्रामुख्याने आश्रितांसाठीचा हा कायदा आहे.
मग आता प्रश्न पडतो कि या तीनच देशांचा समावेश का?  नव्या सुधारणा विधेयकात पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या तीनच देशांचा समावेश कऱण्यात आला आहे. या तिन्ही देशांच्या सीमारेषा भारताशी जोडल्या गेल्या आहेत .पूर्वी पाकिस्तान, बांग्लादेश हे एकाच मोठ्या भूखंडाचा भाग होते. १९४७ मध्ये पाकिस्तान वेगळा देश झाला, १९७१ ला बांग्लादेश वेगळा झाला. त्यापूर्वी सर्वच नागरिक एकाच मोठ्या भूखंडाचा भाग होते. भारत - पाकिस्तान वेगळे झाले, बांग्लादेश फुटून वेगळा झाला त्या-त्या वेळी बांग्लादेश, पाकिस्तान यांनी भारताशी स्वतंत्रपणे द्विपक्षीय करार केला होता. त्या करारानुसार आमच्याकडील अल्पसंख्याकांचे रक्षण करू अशी हमी दिली होती. १९५० मध्ये झालेल्या या करारावर भारतीय पंतप्रधान पंडीत नेहरू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान यांनी स्वाक्षरी केली होती. अशा स्वरूपाच्या कराराचे पालन भारताने काटेकोरपणे केले असले तरीही पाकिस्तानात मात्र अल्पसंख्यांकाना संरक्षण मिळाले नाही. त्यामुळे पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांचे प्रमाण १९४७ मध्ये २३% होते ते आता ५% पर्यंत घटले आहे. याचा अर्थ असा की मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्याकांच्या कत्तली केल्या गेल्या आणि बहुतेक लोकांचे जबरदस्तीने धर्मांतर केले गेले. अनेक जणांचा छळ केला ते भारतात आश्रयाला आले.  त्यांना पाकिस्तानने हाकलून लावले आहे. अशा परिस्थितीत त्यांना आश्रय देणे ही भारताची जबाबदारी आहे. 
हाच प्रकार बांग्लादेशच्या बाबतीतही आहे. बांग्लादेशचे तत्कालीन पंतप्रधान शेख मुजीबुर रहमान यांनीही भारताबरोबर करार केला होता आणि अल्पसंख्याक हिंदूना संरक्षण दिले जाईल अशी लिखित हमी दिलेली होती. त्यांच्या काळात या कराराचे पालन केले गेले. पण शेख खालिदा झिया यांचे सरकार आल्यानंतर अल्पसंख्याकांच्या कत्तली झाल्या, महिलांवर बलात्कार केले गेले. त्यामुळे बांगलादेशातील हिंदू प्रचंड घाबरून पळून भारतात आश्रयाला आले.
अफगाणिस्तानात धर्मांध तालिबानी राजवटीच्या काळात (१९९६-२००२) मूलतत्ववादी (Radical Islamic State) समाजाची निर्मिती कऱण्याच्या प्रयत्नात तिथल्या अल्पसंख्याकांवर भयानक अत्याचार केले. तिथल्या बुद्धांच्या मूर्ती भंग कऱण्यात आल्या. परिणामी, तेथील अल्पसंख्यांकही अन्याय-अत्याचारांना कंटाळून, घाबरुन भारतात आश्रयाला आले. म्हणूनच या तीन देशांची निवड विचारपूर्वक करण्यात आली. 
या तिन्ही देशांपैकी सर्वात जास्त अमानुष छळ होण्याचे प्रमाण पाकिस्तानात होते. द्विराष्ट्र सिद्धान्तानुसार मुसलमान देश म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली त्या आधारावर हा छळ झाला. त्यामुळे हे सर्व आश्रित म्हणून आपल्याकडे आले. पाकिस्तानने त्यांना हुसकावण्यासाठीच हा छळ केला होता. हे लोक गेल्या सात दशकांपासून भारतातच राहात आहेत. पण या लोकांना भारतात कोणतेही अधिकार नाहीत. 
मग आता या कायद्यावर काय आक्षेप आहेत. या कायदा धर्मावरून भेदभाव करतो असा आक्षेप आहे. मात्र अल्पसंख्याकांचा छळ हा धर्माच्या आधारेच करण्यात आला त्यामुळे हा संबंध लावण्यात आला आहे असे केंद्र सरकारचे स्पष्टीकरण आहे. दुसरा आक्षेप म्हणजे या विधेयकामुळे राज्यघटनेच्या धार्मिक भेदभावास प्रतिबंध करणाऱ्या कलम १४ चा भंग होतो आहे, असे काहींचे म्हणणे आहे. हा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नाकारला आहे. त्यांच्या मते ह्या कलमाचा भंग होण्याचा प्रश्नच नाही. कारण या कायद्यान्वये केवळ हिंदूंनाच नागरिकत्व दिले असते आणि इतरांना नाकारले असते तर कलम १४ चा भंग झाला असता. मात्र सहाही अल्पसंख़्यांकाना नागरिकत्व बहाल करण्यात येणार आहे. Reasonable Classification च्या आधारावर हा भेद केला आहे. तिसरा मुद्दा म्हणजे या अल्पसंख्यांकांना सामावून घेताना भारतातील मुसलमानांवर अन्याय होईल, असा एक आक्षेप घेतला जातो. पण त्याला काहीही अर्थ नाही, कारण देशातल्या नागरिकांचा या कायद्याशी काहीही संबंध नाही असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेशातमध्ये अल्पसंख्याकांचे प्रमाण कमी झाले आहे. पण भारतात मात्र ते वाढत चालले आहे. स्वातंत्र्याच्या वेळी देशात असलेले मुसलमानांचे प्रमाण ७-८ % वरून आता २०% झाले आहे. भारतात सर्वच अल्पसंख्यांकाना संरक्षण मिळते आहे. त्यामुळे या तीनही देशातील अल्पसंख्यांकाचा भारताकडे ओढा असणे साहाजिकच आहे. वसुधैव कुटुंबकम् ही आपली संस्कृती आहेच, त्यामुळे या अल्पसंख्यांकाना आश्रय देण्यात काही चूक नाहीच. 
मग या कायद्याची आत्ता गरज का आहे? गेल्या ७० वर्षांपासून हे सर्व अल्पसंख्यांक लोकं भारतात राहात आहेत. परंतु भारतीय राज्यघटनेने दिलेल्या शिक्षण, रोजगार, जगण्याचा अधिकार हे मूलभूत अधिकार या अल्पसंख्याक लोकांना आजही मिळत नाहीत. त्यांना भारतात जमीन विकत घेता येत नाही, घर बांधता येत नाही. भविष्यातही ते तसेच राहिले असते, हे लक्षात घेऊन त्यांना सामावून घेण्यासाठी हा कायदा केला गेला आहे. याआधी या लोकांना एकतर त्यांच्या देशात परत पाठवणे किंवा आपल्याकडील तुरूंगात डांबणे हे दोनच पर्याय होते. पण त्यांना परत पाठवणे शक्य नाही आणि तुरूंगातही ठेवता येत नाही. त्यामुळे अशाच प्रकारचा विशिष्ट कायदा करून या लोकांना भारतात राहायला देणे आवश्यक होते म्हणून हा कायदा करण्यात आला आहे.

15 December, 2019

आपण सावरकर कधी समजून घेणार?


            काल॑ मार्क्सच्या मृत्यूच्याच वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर जन्माला आले- १८८३ - हा इतिहासात आपोआपच जुळून आलेला, पण अर्थपूर्ण योगायोग आहि. दोघंही कट्र ईहवादी, नास्तिक, तर्ककठोर विज्ञाननिष्ठ. पण मार्क्सनं संपूर्ण मानवी इतिहास वर्गयुद्धाच्या चौकटीत बसवून ‘राष्ट्र’ ही संकल्पनाच 'बुर्ज्वा'- शोषकांच्या हातातलं हत्यार- ठरवली. तर सावरकरांनी ‘राष्ट्र’- तेही ‘हिंदुराष्ट्र’ चिंतनाला आपलं सर्वस्व अर्पण केलं. असं म्हटलं जातं की सावरकरांना कुणीतरी कधीतरी विचारलं होतं, 'तुम्ही मार्क्स वाचलाय का?' त्यावर सावरकरांनी आपल्या खास शैलीत त्याला प्रतिसाद दिला होता- 'मार्क्सला विचारा- त्यानं सावरकर वाचला होता का?' आता, मार्क्सच्या मृत्यूच्या वर्षी सावरकर जन्माला आल्यावर बिचारा मार्क्स कुठून आणि कधी वाचणार सावरकरांना? पण सावरकरांच्या विधानाचा असा अर्थ होऊ शकतो, की मार्क्सचं मानवविषयक चिंतन मूलगामी आणि सखोल असेलही; पण सावरकरांचं चिंतन आणि कार्यही तितकंच मूलगामी आणि मूलगामी आहे. फक्त सावरकरांच्या चिंतनाला ‘राष्ट्रीयत्वा'ची फ्रेम ऑफ रेफरन्स’ आहे. आधुनिक भारत यूनायटेड नेशन्समध्ये शत्रूराष्ट्रांना जोडा दाखवू शकेल असं समर्थ राष्ट्र झालं पाहिजे आणि तसं होण्यासाठी 'महाराष्ट्र हा भारताचा खड्गहस्त झाला पाहिजे' असं स्वप्न पडतं ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनाच ! ते सत्यात आणण्यासाठी साहित्यिकांना ' लेखण्या मोडा, आणि बंदुका हाती घ्या...' असं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून सांगतात त्या साहित्यिक स्वातंत्र्यवीर सावरकरांच स्वतंत्र आणि समर्थ भारत हे स्वप्न होतं. १९६५ च्या लढाईत भारतानं पाकवर मात केली तेव्हा सावरकरांनी ठरवलं की आता हा देह ठेवावा. त्यांनी योगीपुरुषाच्या निःसंगतेनं प्रायोपवेशनास प्रारंभ केला आणि २६ फेब्रुवारी १९६६ ला देह ठेवला. १८९८ मध्ये चाफेकर बंधू फासावर जाणार होते त्या रात्रभर अस्वस्थ जागरण करणाऱ्या  'विनायक'नं भगूरमधल्या घरातल्या देवीसमोर १५ व्या वर्षी प्रतिज्ञा केली- 'मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन!' या प्रतिज्ञेनं सुरू झालेला यज्ञ पुढे ६९ वर्षे जीवनाच्या सर्व अंगांत प्रतिभासंपन्न स्पर्श करत पेटता राहिला. बंडखोर विद्यार्थी, कुशल संघटक, इतिहासकार, क्रांतिकारक, काळ्या पाण्याला पुरून उरलेला मृत्युंजय, समाजसुधारक, लेखक, कवी, नाटककार, भाषाप्रभु, विज्ञाननिष्ठ, विवेकनिष्ठ, बुद्धिवादी विचारवंत, जात्युच्छेदनाची भाषा करून कृतीचा मार्ग दाखवणारा मूर्तिभंजक समाज-क्रांतिकारक अशा सर्व रूपांमधून सावरकर सतत समृद्धपणे समोर येत राहतात.
           
त्यांच्या सर्वांगीण प्रतिभेच्या मध्यभागी असतो- भारत! त्या भारताला सावरकरांनी 'हिंदुराष्ट्र' म्हटलं. त्यांच्या राष्ट्रीयत्वाच्या निशाणीला नाव दिलं- 'हिंदुत्व’! स्वातंत्र्योत्तर भारताला कार्यक्रम दिला- 'सैन्याचं हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण.' त्यामुळे सावरकरांकडे पाहण्याचे दोन टोकाचे दोन दृष्टिकोन तयार झाले. 'हिंदुत्वा'च्या विचारधारेबर निष्ठा ठेवणाऱ्या अनेकांना बुद्धिनिष्ठ-विवेकनिष्ठ-विज्ञाननिष्ठ आणि जातीउच्छेदाची भाषा करणारे सावरकर पचनी पडत नाहीत. तर सेक्युलर, समाजवादी वर्गैरे म्हणवणारे 'डावे' सावरकरांच्या ' हिंदुत्व या संज्ञेकडे पाहून सावरकर निषिद्ध ठरवतात. नव्हे नव्हे, त्यांच्या विचारांचं विकृतीकरण करतात. 'हे मातृभूमी, तुजला मन वाहियेले” म्हणत देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सावरकरांना पार ब्रिटिशांचे धाजिणे म्हणण्यापर्यंत अनेकांची मजल जाते. 
         
‘Annihilations of caste’ हे आंबेडकरांप्रमाणेच सावरकरांचंही ध्येय आहे. म्हणूनच सावरकरांनी चवदार तळं आणि काळाराम मंदिर सत्याग्रहांमध्ये आंबेडकरांना पाठिंबा दिला. रत्नागिरीत दलितांच्या हस्ते पतितपावन मंदिराची उभारणी करून ‘वेदेक्ताचा’ अधिकार सर्वांसाठी खुला करायची भूमिका घेतली. आणि त्यांना आज ‘मनुवादी' ठरवायचे प्रयत्न केले जातात. गांधीजींच्या हत्येच्या आरोपातून सन्मानपूर्वक मुक्तता झाली तरी सावरकरांवरचे आरोप अखंडपणे चालूच राहतात. त्यामुळे अंदमानमधल्या विमानतळाला सावरकरांचं नाव देण्याला विरोध, संसदेमध्ये सावरकरांची प्रतिमा लावायला विरोध... तो अर्थात राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी जुमानला नाही, हे आपलं भाग्यच.
सुभाषबाबू आणि सावरकरांची भेट झाली होती म्हटलं तर ‘डाव्यांना' वाटतं, की सुभाषबाबूंचा अपमान केला. म्हणून मंत्रिपदावर असताना मणिशंकर अय्यर अंदमानच्या सेल्युलर जेलमधल्या सावरकरांच्या काव्यपंक्ती काढून टाकून खरं तर सावरकरांच्या देशभक्तीचाच अपमान करतात. मतभेदांचा आदर करायचा असतो, मतभिन्नतेमुळे सावरकरांचं मोठेपण कमी होत नाही, हे समजण्याची शालीनता ते दाखवीत नाहीत. अशी शालीनता स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातले लोकनेते दाखवत होते. 

सावरकरांचे आणि गांधीजींचे टोकाचे मतभेद होते, पण दोघांचंही चारित्र्य, कर्तृत्व, त्यागाबद्दल (प्रसंगी सावरकरांनी गांधीजींवर तीव्र टीका केली असली, किंवा गांधीजींनी एकदा 'कोण सावरकर?' म्हटलं असलं, तरीही) परस्परांना आदर होता. सावरकरांना अंदमानमधून मुक्‍त केलं पाहिजे असं गांधीजींनी वेळोवेळी म्हटलं. तर गांधीवादाशी कट्टर मतभेद असले तरी निझामाच्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवताना सावरकरांच्या अध्यक्षतेखालच्या हिंदू महासभेनं ‘भागानगरचा सत्याग्रह'च केला. पुढे देशाची रक्‍तबंबाळ शोकांतिका झाली तरी फाळणीला दोघांचाही विरोध होता. त्यामुळं दोघांनी १५ ऑगस्टला ‘काळा दिवस' मानलं. आता व्यवहार्य नाही- आणि बहुधा होऊ पण नये; पण दोघांनीही आपापल्या अलग कारणांसाठी- पण फाळणीची ऐतिहासिक चूक दुरूस्त करून पुन्हा अखंड भारत व्हावा असं स्वप्न पाहिलं. स्वातंत्र्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या आपापल्या संघटना स्वातंत्र्यानंतर विसर्जित कराव्यात असं दोघंही म्हणाले. अर्थात काँग्रेसनं गांधीजींचं ऐकलं नाही. मात्र, सावरकरांनी ' अभिनव भारत संघटना' विसर्जित केली. ती विसर्जन करण्याच्या समारंभात तत्कालीन भारताच्या राजकीय चित्राचा आढावा घेत, ' आपल्याला सगळ्यात जवळचं कोण?’ तर सावरकर सांगतात- ‘गांधीजी!' आपल्या 'कृष्णाकाठ' या असामान्य आत्मचरित्रात यशवंतराव चव्हाण आपण सावरकरांच्या आकर्षणानं कसे कऱ्हाडहून स्त्नागिरीला गेलो ते सांगतात. तर 'संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश' आणल्यावर सावरकर महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण या ‘मर्द मराठ्या"च्या पाठीशी उभं राहायला सांगतात.

सावरकरांच्या कल्पनेतला स्वतंत्र भारत ‘एक व्यक्ती, एक मत' या सूत्रावर आधारित प्रजासत्ताक लोकशाही आहे. त्यामध्ये कोणाही विशिष्ट धर्माला 'राजमान्यता' (State Religion) नाही, मुस्लिमद्वेष नाही. पण हा देश १५ ऑगस्टला अस्तित्वात आलेला नाही, किंबा तो ब्रिटिशांनी एकराष्ट्रीयत्वाच्या सूत्रात गुंफलेला नाही; तर या देशाची एकात्मता पाच हजार वर्षे अखंड चालत आली आहे... त्याला सावरकरांनी 'हिंदुत्व' ही संज्ञा वापरली. स्वतंत्र भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं ती संवैधानिक ठरवली आहे.
          
प्रामाणिकपणे सखोल उतरून सावरकर समजावून घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी शेषराव मोरे यांचे ग्रंथ वाचावेत आणि समग्र सावरकर साहित्याचे मुळातून आकलन करून घ्यावं. समाजवादी जीवननिष्ठा जगलेले, खरे उदारमतवादी एस. एम. 'आण्णा' एकदा म्हणाले होते की, 'आम्हाला १९२३ पूर्वीचे सावरकर मान्य आहेत.' (सावरकरांचा 'हिंदुत्व' हा ग्रंथ १९२३ मध्ये प्रकाशित झाला.) त्यांना प्रतिसाद देताना सुधीर फडके म्हणाले होते, ' तुम्हाला १९२३ पर्यंतचे सावरकर आज ५० वर्षांनंतर कळायला, पटायला लागले, तर १९२३ नंतरचे सावरकर आणखी ५० वर्षांनी कळतील!' ती ५० वर्षं आता पूर्ण होत आलीत. समर्थक किंवा विरोधक- सर्वांनाच सावरकर कितपत समजू लागलेत, हे ज्याचं त्यानं ठरवावं. चांगल्या इंग्लिशमध्ये जसं वर्णन असतं- You can love him or you can hate him, but you can not neglect him... असं आज सावरकरांचं स्थान आहे. एकेकाळी हृदयनाथ मंगेशकरांना सावरकरांच्या गाण्यांना चाल लावली म्हणून आकाशवाणीवरची नोकरी गमवावी लागली होती... असं उदंड 'सेक्युलर' अभिव्यक्तिस्वातंत्र्य नांदत होतं! आता ‘जयोस्तुते' आणि 'सागरा प्राणतळमळला' या सार्वकालिक श्रेष्ठ कलाकृती ठरल्या आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासहित अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये पुजारी होण्यासाठी जातीचे निकष संपलेत. स्त्रिया आणि दलितांसहित सर्वांसाठी सन्मानानं मंदिरं खुली होताहेत. अजूनही वाट खूप लांबची चालायची आहे. पण नवा समर्थ भारत साकारला जातोय, हे निश्चित.
         
आपण विवेकनिष्ठ-बुद्धिनिष्ठ-विज्ञाननिष्ठ असायला हवं. जातीपाती विसर्जित करून एकात्म, समतापूर्ण समाज उभा करण्याच्या कामाला लागायला हवं. मराठी भाषा प्रवाही, विकसनशील ठेवताना, तीत नवे नवे प्रवाह सामावून घेताना भाषेची ओळखच पुसून जाणार नाही ना, एवढी भाषाशुद्धीची चळवळ चालू ठेवायला हवी. मराठीची अभिजातता जपताना नवं ज्ञान, नव्या संज्ञा, संकल्पना, संशोधन मराठीत होईल, व्याकरण-मात्रा-वृत्त- छंद जपत जीवनाच्या सर्वे क्षेत्रांत प्रतिभेला नवे धुमारे फुटतील अशासाठी काम करायला हवं.

अविनाश धर्माधिकारी (abdharmadhikari@yahoo.co.in)
(लेखक माजी सनदी अधिकारी तथा 'चाणक्य मंडल परिवार'चे संचालक आहेत.)

14 December, 2019

"बिहाइंड द सिन आणि बिटवीन द लाईन्स"

      महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सध्या वृत्तवाहिन्यांना मुलाखती देण्याचा सपाटाच लावला आहे. दररोज कुठल्या ना कुठल्या राष्ट्रीय किंवा मराठी वृत्तवाहिनीवर त्यांची मुलाखत प्रकाशित होत असते. त्यात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप जरी सारखेच असले तरी काही प्रश्नांची उत्तरे देवेंद्र फडणवीस थेटपणे देत नाहीत. या मुलाखतींमध्ये सर्वाधिक प्रश्न हे '८० तासांचे' अल्पकालीन सरकार, त्याआधी आणि त्यांनतर घडलेल्या घडामोडींवर असतात. शब्द तोलून मापून बोलण्यात पटाईत असलेले देवेंद्र फडणवीस हे काही घडामोडींबाबत मात्र "बिहाइंड द सिन आणि बिटवीन द लाईन्स" असे सूचक शब्द वापरतात. पण या पडद्यामागच्या घडामोडी नक्की कोणत्या आहेत? याचा शोध घेण्याची गरज शोधपत्रकारिता करणाऱ्या व एका घराण्याद्वारे पोसल्या जाणाऱ्या पत्रकारांना वाटत नाही. आपण मात्र बघू कि या घडामोडी कोणत्या असू शकतात. 

देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतमध्ये सांगितले कि २३ नोव्हेंबर ला सरकार स्थापन करण्यापूर्वी २-३ आधी अजित पवार त्यांना येऊन भेटले होते तोपर्यंत भाजप 'Wait and Watch' च्या भूमिकेत होता. २३ नोव्हेंबर च्या आधी २-३ दिवस म्हणजे साधारणतः २० नोव्हेंबर ला अजित आणि देवेंद्र यांची भेट झाली असणार. पण योगायोग असा आहे कि नेमकं त्याच दिवशी म्हणजे २० नोव्हेंबरला शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही दिल्लीत जाऊंन भेट घेतले होती. ती भेट शेतकरी प्रश्नावर होती असे पवार म्हणत असले तरी आजतागायत शेतकऱ्यांसाठी कुठलाही मोठा निर्णय झाला नसल्याने नक्कीच त्यात राजकीय चर्चा झालं असणार आहे. त्या भेटीं काय चर्चा झाली हे पवारांनी नुकत्याच एक मुलाखतीत सांगितले. ते म्हणाले कि मोदींनी "आपण राज्यात व देशात एकत्र काम करु" अशी इच्छा व्यक्त केली व मी स्पष्ट नकार दिला. या संदर्भात फडणवीसांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले कि शरद पवार हे त्या भेटीतील अर्धवट माहिती सांगत आहेत. म्हणजे त्या भेटीत नक्कीच खूप महत्वाच्या गोष्टी ठरल्या असतील. कारण त्याच दिवशी अजित पवार देवेंद्र फडणवीसांची भेट घेतात. याला योगायोग म्हणता येत नाही.

 देवेंद्र फडणवीस आणखी एक महत्वाचा खुलासा केलाय कि विधानसभेसाठी शिवसेनेसोबत युती करण्याची राज्यस्तरीय भाजपनेत्यांची इच्छा नव्हती परंतु भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मात्र युती तोडण्यास नकार दिला कारण त्याने जनतेत "भाजप लोकसभेसाठी युती करते पण विधानसभेसाठी युती तोडते" असा चुकीचा संदेश गेला असता असे सांगितले. याचा अर्थ युती करण्यास भाजप उत्सुक नव्हता आणि युती शिवसेनेकडूनच तुटावी असे भाजपला वाटत असणार आहे. भाजपची महाराष्ट्रात स्वबळावर सरकार स्थापन करण्याची इच्छा आहे ही गोष्ट लपून राहिलेली नाही आणि त्यांनी ते वारंवार बोलूनही दाखवले आहे. परंतु त्यासाठी युती तोडावी लागणार होती. त्यासाठी त्यांनी शरद पवार यांची मदत घेतली असू शकते. २४ ऑक्टोबरला विधानसभेचे निकाल लागल्यानंतर शिवसेनेकडून युती तोडण्याच्या हालचाली होऊ लागल्या ज्या भाजपला अपेक्षितच होत्या परंतु शिवसेना द्विधा मनस्थितीत असल्याने त्या हालचाली वेगवान होत नव्हत्या. शिवसेनेने भाजपसोडून काँग्रेससोबत जाऊन आघाडी करावी यासाठी भाजप आग्रही होती. परंतु २० नोव्हेंबर पर्यंत महाविकासआघाडीमध्ये खूप मतभेद असल्यामुळे सरकार स्थापन होत नव्हते. ते लवकर स्थापन व्हावे अशी भाजपची इच्छा होती म्हणून भाजप वाट पाहत बसला होता. पण ते स्थापन होत नसल्याने भाजप आणि राष्ट्रवादी टेन्शनमध्ये होते. म्हणून शरद पवार यांनी मोदींची २० नोव्हेंबर २०१९ ला भेट घेऊन हे आघाडी सरकार लवकर स्थापन होण्यासाठी एक नाटक करण्याचे योजले होते. मोदींनी त्याला संमती दिली. आणि शरद पवारांच्या सल्ल्याने अजित पवार भाजपकडे सरकार स्थापन करण्यासाठी आले.


२० नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर सकाळी ८ वाजेपर्यंत पडद्यामागे अनेक गोष्टी घडल्या. आणि शरद पवार मात्र "आपल्याला काहीच ठाऊक नाही" असे दाखवत राहिले. पण तेच तर या सरकारचे खरे सूत्रधार होते. आणि या भाजप-राष्ट्रवादी सरकारचा अपेक्षित परिणाम झाला. आणि आपले सर्व मतभेद तात्पुरता बाजूला ठेवत शिवसेना आणि काँग्रेस वेगाने जवळ आले. आणि ठरल्याप्रमाणे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला आणि आघाडी सरकार बनले. या पक्षांत मतभेद इतके आहेत की आज यांचे खातेवाटप जरी झाले असले तरी मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला घ्यायचे यावर अनेक मतभेद आहेत. आणि या विस्तारात जागा न मिळालेल्या नाराज आमदारांना भाजप गळाला लावेल अशी भीतीही या आघाडीतील पक्षांना वाटत आहे. कदाचित याच मतभेदांमुळे काही दिवसात राष्ट्रवादी या सरकारच्या बाहेर पडेल आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करेल. पण नुकसान मात्र शिवसेना आणि कॉग्रेसचे होणार आहे कारण आपल्या विचारधारा सोडून हे पक्ष फक्त सत्तेसाठी एकत्र आलेत हे जनता पाहते आहे. आणि नुकत्याच झालेल्या कर्नाटक पोटनिवडणूक निकालावरून तर हे स्पष्ट होते कि मोठ्या पक्षाला बाजूला ठेऊन फक्त सत्तेसाठी इतर पक्षांची संधीसाधू आघाडी जनतेला मान्य होत नाही व मतदार अशा आघाडीला येणाऱ्या निवडणुकीत नक्की धडा शिकवतात.

13 December, 2019

मोदींनी कलम ३७० कसे हटवले?

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी अत्यंत हुशारीने आणि गुप्तपणे जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० कसे हटवले ते क्रमाक्रमाने आपण पाहू .


टप्पा १. 
मेहबूबा मुफ्ती सरकारकडून भाजपने पाठिंबा काढून घेणे. ही घटना सर्वात महत्वाची होती जेणेकरून कलम ३७० हटवण्याला संमती देण्याचे अधिकार राज्यशासनाकडून राज्यपालांना मिळतील. त्यानंतर विधानसभा बरखास्त केली. व राज्यशासनाचे कार्यकारी अधिकार राज्यपालास हस्तांतरित झाले. 


टप्पा २.
राष्ट्रपतींनी कलम ३५६ अंतर्गत अधिकारांचा वापर करून २०१८ मध्ये जम्मू-काश्मीर मध्ये राष्ट्रपती राजवट लावून विधानसभेचे कायदे करण्याचे अधिकार संसदेकडे हस्तांतरित केले.

टप्पा ३.
यास आणखी मान्यता मिळवण्याकरिता आणि सुप्रीम कोर्टाकडून पुढे कुठलीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी २०१८ मध्ये अनुसूचित जाती-जमाती दुरुस्ती विधेयक टप्पा २ मध्ये  सांगितलेले अधिकार वापरुन मंजूर करण्यात आले आणि अपेक्षेनुसार कोर्टाने कुठलीही अडचण निर्माण केली नाही.

टप्पा ४.
आता अनुसूचित जाती-जमाती दुरुस्ती विधेयकास मान्यता देण्यात आल्यामुळे राज्यपालांची सत्ता निर्विवाद होते. १९५२ च्या अधिसूचनेचा उपयोग करून, संविधानसभेचे अधिकार राज्य विधानसभेला हस्तांतरित केले गेले. (खाली दिलेल्या नोटिफिकेशनमधील शेवटचे कलम पहा.)
आणि राज्य विधानसभेची सत्ता २०१८ पासून राज्यपालांकडेच होती.


- जून २०१८ मध्ये बीजेपीने जम्मू-काश्मीरची सत्ता सोडल्यानंतर सापळा रचला. आणि जेव्हा राज्यपालांना  वाटले कि आता कोणताही पक्ष किंवा युती सत्ता स्थापन करू शकत नाही तेव्हा त्यांनी विधानसभा विसर्जित केली. खरी गोम विधानसभा विसर्जित करण्यातच होती. 




वरील सर्व परिस्थिती तयार होईपर्यंत वेळ वाया घालवण्यासाठीच भाजपने सरकार तयार केले होते.

सारांश - 
१. आवश्यक परिस्थितीसाठी वेळ वाया घालवण्यासाठीच भाजपने सरकार तयार करणे. 
२. राज्यपालांचे अधिकार वाढीसाठी सरकारचे समर्थन काढणे. 
3. विवादित विसर्जन आणि राष्ट्रपती राजवट 
४. राज्यपाल सशक्त करण्यासाठी कलाम ३५६ चा वापर.
५. अनुसूचित जाती-जमाती दुरुस्ती विधेयक वापरुन सुप्रीम कोर्टाची संमती. 
६. १९५२ चा अधिनियम वापरून राज्यपालांना विधानभेचे अधिकार 
७. आवश्यक परिस्तिथी तयार झाली. 

- जम्मू-काश्मीरचे त्रिविभाजन का केले नाही, हे सांगण्यासाठी राजा हरिसिंह यांनी स्वाक्षरी केलेल्या सामीलनामा करारात जम्मू-काश्मीरचा उल्लेख आहे. म्हणून पीओके परत भारतात सामील होईपर्यंत 'जम्मू-काश्मीर' हे राज्य अस्तित्वात असणे आवश्यक आहे.

- भविष्यकाळात जर भारत पीओकेचा दावा करणार असेल तर मग या सामीलनामा कराराची आवश्यकता असेल. कारण त्यात या जम्मू-काश्मीरचा उल्लेख आहे. 


- खरी परीक्षा सरकारमधून माघार घेण्याच्या वेळी होती. सार्वत्रिक निवडणुकीच्या अवघ्या एका वर्षापूर्वीच भाजपाने माघार घेतली. आता त्यांना निवडणूक आयोगाने निवडणुकांची तारीख जाहीर होईपर्यंत थांबावे लागले. परंतु जम्मू-काश्मीरमधील पक्षांनी हे होण्यापूर्वी युती केली असती तर जम्मू-काश्मीर मध्ये सरकार स्थापन झाले असते. आणि भाजपची अडचण झाली असती. पण येथे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मस्त घोळ घातला.

- या लवकर विघटनानंतर आणखी एक समस्या निर्माण झाली. आता लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकासोबत जम्मू-काश्मीरच्या निवडणुका होऊ शकत होत्या. पण गृहमंत्रालयाने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आणि निवडणुका लांबणीवर पडल्या. त्यामुळे सत्ता अजूनही राज्यपालांकडे होती.

- हा खेळ मेहबुबाला समजला होता तसेच उमर अब्दुल्ला यांनाही कळला होता म्हणून ते सारखे मोदी सरकारवर टीकाही करत होते.  


- परंतु निवडणूक आयोगानेही सरकारला अपेक्षित असे केले. जम्मू-काश्मीरच्या निवडणुका जाहीर केल्या नाहीत. आता, २०१९ लोकसभा निवडणुकीपर्यंत राज्यपालांच्या सत्तेला कोणताही धोका नव्हता.

- आता अनुसूचित जाती-जमाती दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी योग्य वेळ आली होती. अशा प्रकारे, राज्यपालांची शक्ती स्थापित केली. या विधेयकात राज्यपालांची संमती हीच विधानसभेची संमती आहे असे मानण्यात आले. सुप्रीम कोर्टानेही ते स्वीकारले. आता सरकारच्या प्रत्येक निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणारे न्यायिक कार्यकर्ते सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या पाठीमागे लागून या विधेयकाबाबत पुनर्विचार करायचा आग्रह करू शकत नव्हते. जर त्यांनी त्याचा पाठपुरावा केला असता तर ते दलित विरोधी मानले जातील अशी भीती होती. म्हणून ते गप्प बसले. एकदा त्यांनी अनुसूचित जाती-जमाती दुरुस्ती विधेयक स्वीकारल्यानंतर ते परत जाऊ शकत नाहीत. हे न्यायिक कार्यकर्ते खऱ्या 'चाणक्यशी' लढा देऊ शकत नाहीत.

- सरकार तयार करण्यापासून ते योग्य वेळी माघार घेण्यापर्यंत, राज्यपालांना त्यांची शक्ती वैध करण्यासाठी अनुसूचित जाती-जमाती दुरुस्ती विधेयकाचा वापर करण्यापर्यंत भाजपाने मीडिया, विरोधी पक्ष, न्यायपालिका आणि टीकाकारांचा पुरेपूर वापर करून घेतला. या सगळ्यामागील थिंक टँक पाहून मी खरोखरच चकित झालो. प्रत्येकजण जम्मू-काश्मीरच्या भविष्यच्या विषयी बोलत होता मात्र कॉंग्रेस आणि पीडीपीमध्ये भाजप फाटाफूट करीत होता. शक्य तितका उशीर युती होण्यासाठी करणे हे त्यांचे एकमेव उद्दीष्ट होते. जरी मेहबुबाला ओमरसोबत युती हवी होती, तरीही भाजपने त्यांची संख्या कमी असल्याचे निश्चित केले.


- भाजपचा आणखी गट ह्या युतीला उशीर करण्यासाठी कामाला लागला होता. 


- आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, कलम ३७० काढलं गेलेल नाही, तर ते शक्तीहीन बनविलं गेलं आहे. त्यामुळे कोणतीही घटनादुरुस्ती केली गेली नाही.

- सर्वात महत्वाची घटना 'गहाळ फॅक्स प्रकरण' ही होती. यामुळे कलम ३७० च्या शेवटावर  शिक्कामोर्तब झाले.


- भाजपने सरकार स्थापन केले नसते तर आमदाराची बंडखोरी अशक्य झाली असती. यामुळे त्यांना पीडीपी आणि एनसीमध्ये फूट पाडण्यास मदत झाली. भाजप-पीडीपी युतीसाठी लोकांनी त्यांना शिव्या दिल्या आजही देतात पण ते करणे किती आवश्यक होते हे आज कळते.

- १९५२ च्या अधिसूचनेबद्दल काही लोक विचारत आहेत. १९५२ मध्ये राष्ट्रपतींची अधिसूचना विधानसभा नसल्यामुळे राज्य विधानसभेच्या संमतीशिवाय घटनासमितीच्या सम्मतीने मंजूर करण्यात आला. हा एक अपवाद १९५२ मध्ये निर्माण केला गेला होता त्याचा आज मोदींनी उपयोग केला. आज घटना समिती अस्तित्वात नसल्याने तिचे अधिकार विधानसभेला आणि विधानसभाही  अस्तित्वात नसल्याने तिचे अधिकार थेट राज्यपालांना मिळाले. राज्यघटनेचे कलम ३५६ थेट जम्मू-काश्मीरला लागू होत नाही. त्यासाठी आधी जम्मू-काश्मीरच्या घटनेतील कलम ९२ च्या अंतर्गत राज्यपाल राजवट ६ महिन्यांकरीता लागू होते आणि नंतरच राष्ट्रपती राजवट लागू शकते.

- एकदा पीडीपी आणि एनसी दोघेही मोदी सरकारला राष्ट्रपती राजवट घोषित करण्यात रोखू शकले नाहीत, तेव्हा पाकिस्तान चित्रात दिसू लागला. मार्च मध्ये निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेपूर्वी कलम ३७० काढले गेले असते परंतु पुलवामा हल्ल्यामुळे मोदीजींना ते थांबवावे लागले.

- पाकिस्तानला दोन गोष्टींची अपेक्षा होती.


१. मोदीजी निवडणुकांबद्दल विचार करतील आणि पुलवामानंतरही कलम ३७० काढतील. पण त्यामुळे कलम ३७० काढण्याचे आंतरराष्ट्रीयकरण झाले असते. मोदीजींनी कलम ३७० संसदेचा वापर करून काढायचे ठरवले. जर मोदींनी तसे केले नसते तर पाकिस्तानला कलम ३७० काढण्याचे आंतरराष्ट्रीयकरण करण्यात यश आले असते.
काश्मीरमध्ये कोणत्याही सर्जिकल स्ट्राईकसाठी पाकिस्तान तयार होता पण बालाकोटला हवाई हल्ले झाले जे  पाकिस्तानला अपेक्षित नव्हते. मोदींनी पाक प्रदेशात जास्त खोलवर हल्ला करण्याची मोठी जोखीम पत्करली  जेणेकरुन पाक मागील वेळेप्रमाणे हे हल्ले नाकारू शकत नाही. भारत इतक्या खोलवर हल्ले करेल याचीही पाकिस्तानला अपेक्षा नव्हती.

२. पाकिस्तानची दुसरी अपेक्षा होती की मोदीजी ती पार करणार नाहीत. मागच्या वेळेपेक्षा मोदीजी कमी जागा जिंकतील अशी त्यांची अपेक्षा होती. होय, मोदीजी परत आले आणि त्याचबरोबर ते आणखी मोठा जनादेश घेऊन परत आले. मोदीजी कलम ३७० हटवणार आहेत हे पाकिस्तानला आधीच समजले होते पण वेळ घालवण्यापलीकडे दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हता. ते उशीर करण्यात यशस्वी ठरले पण ते आंतरराष्ट्रीयकरण करण्यात अपयशी ठरले. पाकिस्तानने कलम ३७० वाचवण्यासाठी मोठा राजकीय धोका पत्करला. परंतु त्याचा काही फायदा झाला नाही.


- राजकारणापेक्षा देशाला महत्व देण्याचा शहाणपणा मोदीजींनी केली. ५ ऑगस्ट रोजी, जेव्हा कलम ३७० काढून टाकले गेले, तेव्हा पाकिस्तानमध्ये ट्विटर युद्धाच्या जोरावर ते कोणतेही आंतरराष्ट्रीय प्रेस आकर्षित करू शकले नाहीत. मला वाटते हा सर्वात कठीण भाग होता. तो एक प्रचंड धोका होता, परंतु त्याचा फायदा देशाला झाला. सार्वत्रिक निवडणुकांसह जम्मू-काश्मीरच्या निवडणुकाही होतील अशी पाकिस्तानलाही अपेक्षा होती. परंतु बालाकोटच्या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांत तणाव इतका वाढला की ते अशक्य झाले.

- तर, लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेसह राष्ट्रपती राजवट काढून टाकण्याच्या प्रत्येक आशेचा मृत्यू झाला. मेहबूबा मुफ्ती अंतिम मुख्यमंत्री ठरल्या. ते विलंब करण्यास सक्षम होते परंतु त्या विलंबाने काही फायदा झाला नाही कारण मोदी केवळ सत्तेवर आलेच नाही तर राज्य विधानसभेच्या निवडणुकादेखील निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकल्या. तसेच, मोदीजी हटविण्यासह पुढे जाण्याच्या जाळ्यात अडकले नाहीत.

हा लेख @AayushNarayan3 यांच्या लेखाचे मराठी भाषांतर आहे