15 December, 2019

आपण सावरकर कधी समजून घेणार?


            काल॑ मार्क्सच्या मृत्यूच्याच वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर जन्माला आले- १८८३ - हा इतिहासात आपोआपच जुळून आलेला, पण अर्थपूर्ण योगायोग आहि. दोघंही कट्र ईहवादी, नास्तिक, तर्ककठोर विज्ञाननिष्ठ. पण मार्क्सनं संपूर्ण मानवी इतिहास वर्गयुद्धाच्या चौकटीत बसवून ‘राष्ट्र’ ही संकल्पनाच 'बुर्ज्वा'- शोषकांच्या हातातलं हत्यार- ठरवली. तर सावरकरांनी ‘राष्ट्र’- तेही ‘हिंदुराष्ट्र’ चिंतनाला आपलं सर्वस्व अर्पण केलं. असं म्हटलं जातं की सावरकरांना कुणीतरी कधीतरी विचारलं होतं, 'तुम्ही मार्क्स वाचलाय का?' त्यावर सावरकरांनी आपल्या खास शैलीत त्याला प्रतिसाद दिला होता- 'मार्क्सला विचारा- त्यानं सावरकर वाचला होता का?' आता, मार्क्सच्या मृत्यूच्या वर्षी सावरकर जन्माला आल्यावर बिचारा मार्क्स कुठून आणि कधी वाचणार सावरकरांना? पण सावरकरांच्या विधानाचा असा अर्थ होऊ शकतो, की मार्क्सचं मानवविषयक चिंतन मूलगामी आणि सखोल असेलही; पण सावरकरांचं चिंतन आणि कार्यही तितकंच मूलगामी आणि मूलगामी आहे. फक्त सावरकरांच्या चिंतनाला ‘राष्ट्रीयत्वा'ची फ्रेम ऑफ रेफरन्स’ आहे. आधुनिक भारत यूनायटेड नेशन्समध्ये शत्रूराष्ट्रांना जोडा दाखवू शकेल असं समर्थ राष्ट्र झालं पाहिजे आणि तसं होण्यासाठी 'महाराष्ट्र हा भारताचा खड्गहस्त झाला पाहिजे' असं स्वप्न पडतं ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनाच ! ते सत्यात आणण्यासाठी साहित्यिकांना ' लेखण्या मोडा, आणि बंदुका हाती घ्या...' असं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून सांगतात त्या साहित्यिक स्वातंत्र्यवीर सावरकरांच स्वतंत्र आणि समर्थ भारत हे स्वप्न होतं. १९६५ च्या लढाईत भारतानं पाकवर मात केली तेव्हा सावरकरांनी ठरवलं की आता हा देह ठेवावा. त्यांनी योगीपुरुषाच्या निःसंगतेनं प्रायोपवेशनास प्रारंभ केला आणि २६ फेब्रुवारी १९६६ ला देह ठेवला. १८९८ मध्ये चाफेकर बंधू फासावर जाणार होते त्या रात्रभर अस्वस्थ जागरण करणाऱ्या  'विनायक'नं भगूरमधल्या घरातल्या देवीसमोर १५ व्या वर्षी प्रतिज्ञा केली- 'मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन!' या प्रतिज्ञेनं सुरू झालेला यज्ञ पुढे ६९ वर्षे जीवनाच्या सर्व अंगांत प्रतिभासंपन्न स्पर्श करत पेटता राहिला. बंडखोर विद्यार्थी, कुशल संघटक, इतिहासकार, क्रांतिकारक, काळ्या पाण्याला पुरून उरलेला मृत्युंजय, समाजसुधारक, लेखक, कवी, नाटककार, भाषाप्रभु, विज्ञाननिष्ठ, विवेकनिष्ठ, बुद्धिवादी विचारवंत, जात्युच्छेदनाची भाषा करून कृतीचा मार्ग दाखवणारा मूर्तिभंजक समाज-क्रांतिकारक अशा सर्व रूपांमधून सावरकर सतत समृद्धपणे समोर येत राहतात.
           
त्यांच्या सर्वांगीण प्रतिभेच्या मध्यभागी असतो- भारत! त्या भारताला सावरकरांनी 'हिंदुराष्ट्र' म्हटलं. त्यांच्या राष्ट्रीयत्वाच्या निशाणीला नाव दिलं- 'हिंदुत्व’! स्वातंत्र्योत्तर भारताला कार्यक्रम दिला- 'सैन्याचं हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण.' त्यामुळे सावरकरांकडे पाहण्याचे दोन टोकाचे दोन दृष्टिकोन तयार झाले. 'हिंदुत्वा'च्या विचारधारेबर निष्ठा ठेवणाऱ्या अनेकांना बुद्धिनिष्ठ-विवेकनिष्ठ-विज्ञाननिष्ठ आणि जातीउच्छेदाची भाषा करणारे सावरकर पचनी पडत नाहीत. तर सेक्युलर, समाजवादी वर्गैरे म्हणवणारे 'डावे' सावरकरांच्या ' हिंदुत्व या संज्ञेकडे पाहून सावरकर निषिद्ध ठरवतात. नव्हे नव्हे, त्यांच्या विचारांचं विकृतीकरण करतात. 'हे मातृभूमी, तुजला मन वाहियेले” म्हणत देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सावरकरांना पार ब्रिटिशांचे धाजिणे म्हणण्यापर्यंत अनेकांची मजल जाते. 
         
‘Annihilations of caste’ हे आंबेडकरांप्रमाणेच सावरकरांचंही ध्येय आहे. म्हणूनच सावरकरांनी चवदार तळं आणि काळाराम मंदिर सत्याग्रहांमध्ये आंबेडकरांना पाठिंबा दिला. रत्नागिरीत दलितांच्या हस्ते पतितपावन मंदिराची उभारणी करून ‘वेदेक्ताचा’ अधिकार सर्वांसाठी खुला करायची भूमिका घेतली. आणि त्यांना आज ‘मनुवादी' ठरवायचे प्रयत्न केले जातात. गांधीजींच्या हत्येच्या आरोपातून सन्मानपूर्वक मुक्तता झाली तरी सावरकरांवरचे आरोप अखंडपणे चालूच राहतात. त्यामुळे अंदमानमधल्या विमानतळाला सावरकरांचं नाव देण्याला विरोध, संसदेमध्ये सावरकरांची प्रतिमा लावायला विरोध... तो अर्थात राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी जुमानला नाही, हे आपलं भाग्यच.
सुभाषबाबू आणि सावरकरांची भेट झाली होती म्हटलं तर ‘डाव्यांना' वाटतं, की सुभाषबाबूंचा अपमान केला. म्हणून मंत्रिपदावर असताना मणिशंकर अय्यर अंदमानच्या सेल्युलर जेलमधल्या सावरकरांच्या काव्यपंक्ती काढून टाकून खरं तर सावरकरांच्या देशभक्तीचाच अपमान करतात. मतभेदांचा आदर करायचा असतो, मतभिन्नतेमुळे सावरकरांचं मोठेपण कमी होत नाही, हे समजण्याची शालीनता ते दाखवीत नाहीत. अशी शालीनता स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातले लोकनेते दाखवत होते. 

सावरकरांचे आणि गांधीजींचे टोकाचे मतभेद होते, पण दोघांचंही चारित्र्य, कर्तृत्व, त्यागाबद्दल (प्रसंगी सावरकरांनी गांधीजींवर तीव्र टीका केली असली, किंवा गांधीजींनी एकदा 'कोण सावरकर?' म्हटलं असलं, तरीही) परस्परांना आदर होता. सावरकरांना अंदमानमधून मुक्‍त केलं पाहिजे असं गांधीजींनी वेळोवेळी म्हटलं. तर गांधीवादाशी कट्टर मतभेद असले तरी निझामाच्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवताना सावरकरांच्या अध्यक्षतेखालच्या हिंदू महासभेनं ‘भागानगरचा सत्याग्रह'च केला. पुढे देशाची रक्‍तबंबाळ शोकांतिका झाली तरी फाळणीला दोघांचाही विरोध होता. त्यामुळं दोघांनी १५ ऑगस्टला ‘काळा दिवस' मानलं. आता व्यवहार्य नाही- आणि बहुधा होऊ पण नये; पण दोघांनीही आपापल्या अलग कारणांसाठी- पण फाळणीची ऐतिहासिक चूक दुरूस्त करून पुन्हा अखंड भारत व्हावा असं स्वप्न पाहिलं. स्वातंत्र्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या आपापल्या संघटना स्वातंत्र्यानंतर विसर्जित कराव्यात असं दोघंही म्हणाले. अर्थात काँग्रेसनं गांधीजींचं ऐकलं नाही. मात्र, सावरकरांनी ' अभिनव भारत संघटना' विसर्जित केली. ती विसर्जन करण्याच्या समारंभात तत्कालीन भारताच्या राजकीय चित्राचा आढावा घेत, ' आपल्याला सगळ्यात जवळचं कोण?’ तर सावरकर सांगतात- ‘गांधीजी!' आपल्या 'कृष्णाकाठ' या असामान्य आत्मचरित्रात यशवंतराव चव्हाण आपण सावरकरांच्या आकर्षणानं कसे कऱ्हाडहून स्त्नागिरीला गेलो ते सांगतात. तर 'संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश' आणल्यावर सावरकर महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण या ‘मर्द मराठ्या"च्या पाठीशी उभं राहायला सांगतात.

सावरकरांच्या कल्पनेतला स्वतंत्र भारत ‘एक व्यक्ती, एक मत' या सूत्रावर आधारित प्रजासत्ताक लोकशाही आहे. त्यामध्ये कोणाही विशिष्ट धर्माला 'राजमान्यता' (State Religion) नाही, मुस्लिमद्वेष नाही. पण हा देश १५ ऑगस्टला अस्तित्वात आलेला नाही, किंबा तो ब्रिटिशांनी एकराष्ट्रीयत्वाच्या सूत्रात गुंफलेला नाही; तर या देशाची एकात्मता पाच हजार वर्षे अखंड चालत आली आहे... त्याला सावरकरांनी 'हिंदुत्व' ही संज्ञा वापरली. स्वतंत्र भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं ती संवैधानिक ठरवली आहे.
          
प्रामाणिकपणे सखोल उतरून सावरकर समजावून घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी शेषराव मोरे यांचे ग्रंथ वाचावेत आणि समग्र सावरकर साहित्याचे मुळातून आकलन करून घ्यावं. समाजवादी जीवननिष्ठा जगलेले, खरे उदारमतवादी एस. एम. 'आण्णा' एकदा म्हणाले होते की, 'आम्हाला १९२३ पूर्वीचे सावरकर मान्य आहेत.' (सावरकरांचा 'हिंदुत्व' हा ग्रंथ १९२३ मध्ये प्रकाशित झाला.) त्यांना प्रतिसाद देताना सुधीर फडके म्हणाले होते, ' तुम्हाला १९२३ पर्यंतचे सावरकर आज ५० वर्षांनंतर कळायला, पटायला लागले, तर १९२३ नंतरचे सावरकर आणखी ५० वर्षांनी कळतील!' ती ५० वर्षं आता पूर्ण होत आलीत. समर्थक किंवा विरोधक- सर्वांनाच सावरकर कितपत समजू लागलेत, हे ज्याचं त्यानं ठरवावं. चांगल्या इंग्लिशमध्ये जसं वर्णन असतं- You can love him or you can hate him, but you can not neglect him... असं आज सावरकरांचं स्थान आहे. एकेकाळी हृदयनाथ मंगेशकरांना सावरकरांच्या गाण्यांना चाल लावली म्हणून आकाशवाणीवरची नोकरी गमवावी लागली होती... असं उदंड 'सेक्युलर' अभिव्यक्तिस्वातंत्र्य नांदत होतं! आता ‘जयोस्तुते' आणि 'सागरा प्राणतळमळला' या सार्वकालिक श्रेष्ठ कलाकृती ठरल्या आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासहित अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये पुजारी होण्यासाठी जातीचे निकष संपलेत. स्त्रिया आणि दलितांसहित सर्वांसाठी सन्मानानं मंदिरं खुली होताहेत. अजूनही वाट खूप लांबची चालायची आहे. पण नवा समर्थ भारत साकारला जातोय, हे निश्चित.
         
आपण विवेकनिष्ठ-बुद्धिनिष्ठ-विज्ञाननिष्ठ असायला हवं. जातीपाती विसर्जित करून एकात्म, समतापूर्ण समाज उभा करण्याच्या कामाला लागायला हवं. मराठी भाषा प्रवाही, विकसनशील ठेवताना, तीत नवे नवे प्रवाह सामावून घेताना भाषेची ओळखच पुसून जाणार नाही ना, एवढी भाषाशुद्धीची चळवळ चालू ठेवायला हवी. मराठीची अभिजातता जपताना नवं ज्ञान, नव्या संज्ञा, संकल्पना, संशोधन मराठीत होईल, व्याकरण-मात्रा-वृत्त- छंद जपत जीवनाच्या सर्वे क्षेत्रांत प्रतिभेला नवे धुमारे फुटतील अशासाठी काम करायला हवं.

अविनाश धर्माधिकारी (abdharmadhikari@yahoo.co.in)
(लेखक माजी सनदी अधिकारी तथा 'चाणक्य मंडल परिवार'चे संचालक आहेत.)

14 December, 2019

"बिहाइंड द सिन आणि बिटवीन द लाईन्स"

      महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सध्या वृत्तवाहिन्यांना मुलाखती देण्याचा सपाटाच लावला आहे. दररोज कुठल्या ना कुठल्या राष्ट्रीय किंवा मराठी वृत्तवाहिनीवर त्यांची मुलाखत प्रकाशित होत असते. त्यात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप जरी सारखेच असले तरी काही प्रश्नांची उत्तरे देवेंद्र फडणवीस थेटपणे देत नाहीत. या मुलाखतींमध्ये सर्वाधिक प्रश्न हे '८० तासांचे' अल्पकालीन सरकार, त्याआधी आणि त्यांनतर घडलेल्या घडामोडींवर असतात. शब्द तोलून मापून बोलण्यात पटाईत असलेले देवेंद्र फडणवीस हे काही घडामोडींबाबत मात्र "बिहाइंड द सिन आणि बिटवीन द लाईन्स" असे सूचक शब्द वापरतात. पण या पडद्यामागच्या घडामोडी नक्की कोणत्या आहेत? याचा शोध घेण्याची गरज शोधपत्रकारिता करणाऱ्या व एका घराण्याद्वारे पोसल्या जाणाऱ्या पत्रकारांना वाटत नाही. आपण मात्र बघू कि या घडामोडी कोणत्या असू शकतात. 

देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतमध्ये सांगितले कि २३ नोव्हेंबर ला सरकार स्थापन करण्यापूर्वी २-३ आधी अजित पवार त्यांना येऊन भेटले होते तोपर्यंत भाजप 'Wait and Watch' च्या भूमिकेत होता. २३ नोव्हेंबर च्या आधी २-३ दिवस म्हणजे साधारणतः २० नोव्हेंबर ला अजित आणि देवेंद्र यांची भेट झाली असणार. पण योगायोग असा आहे कि नेमकं त्याच दिवशी म्हणजे २० नोव्हेंबरला शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही दिल्लीत जाऊंन भेट घेतले होती. ती भेट शेतकरी प्रश्नावर होती असे पवार म्हणत असले तरी आजतागायत शेतकऱ्यांसाठी कुठलाही मोठा निर्णय झाला नसल्याने नक्कीच त्यात राजकीय चर्चा झालं असणार आहे. त्या भेटीं काय चर्चा झाली हे पवारांनी नुकत्याच एक मुलाखतीत सांगितले. ते म्हणाले कि मोदींनी "आपण राज्यात व देशात एकत्र काम करु" अशी इच्छा व्यक्त केली व मी स्पष्ट नकार दिला. या संदर्भात फडणवीसांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले कि शरद पवार हे त्या भेटीतील अर्धवट माहिती सांगत आहेत. म्हणजे त्या भेटीत नक्कीच खूप महत्वाच्या गोष्टी ठरल्या असतील. कारण त्याच दिवशी अजित पवार देवेंद्र फडणवीसांची भेट घेतात. याला योगायोग म्हणता येत नाही.

 देवेंद्र फडणवीस आणखी एक महत्वाचा खुलासा केलाय कि विधानसभेसाठी शिवसेनेसोबत युती करण्याची राज्यस्तरीय भाजपनेत्यांची इच्छा नव्हती परंतु भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मात्र युती तोडण्यास नकार दिला कारण त्याने जनतेत "भाजप लोकसभेसाठी युती करते पण विधानसभेसाठी युती तोडते" असा चुकीचा संदेश गेला असता असे सांगितले. याचा अर्थ युती करण्यास भाजप उत्सुक नव्हता आणि युती शिवसेनेकडूनच तुटावी असे भाजपला वाटत असणार आहे. भाजपची महाराष्ट्रात स्वबळावर सरकार स्थापन करण्याची इच्छा आहे ही गोष्ट लपून राहिलेली नाही आणि त्यांनी ते वारंवार बोलूनही दाखवले आहे. परंतु त्यासाठी युती तोडावी लागणार होती. त्यासाठी त्यांनी शरद पवार यांची मदत घेतली असू शकते. २४ ऑक्टोबरला विधानसभेचे निकाल लागल्यानंतर शिवसेनेकडून युती तोडण्याच्या हालचाली होऊ लागल्या ज्या भाजपला अपेक्षितच होत्या परंतु शिवसेना द्विधा मनस्थितीत असल्याने त्या हालचाली वेगवान होत नव्हत्या. शिवसेनेने भाजपसोडून काँग्रेससोबत जाऊन आघाडी करावी यासाठी भाजप आग्रही होती. परंतु २० नोव्हेंबर पर्यंत महाविकासआघाडीमध्ये खूप मतभेद असल्यामुळे सरकार स्थापन होत नव्हते. ते लवकर स्थापन व्हावे अशी भाजपची इच्छा होती म्हणून भाजप वाट पाहत बसला होता. पण ते स्थापन होत नसल्याने भाजप आणि राष्ट्रवादी टेन्शनमध्ये होते. म्हणून शरद पवार यांनी मोदींची २० नोव्हेंबर २०१९ ला भेट घेऊन हे आघाडी सरकार लवकर स्थापन होण्यासाठी एक नाटक करण्याचे योजले होते. मोदींनी त्याला संमती दिली. आणि शरद पवारांच्या सल्ल्याने अजित पवार भाजपकडे सरकार स्थापन करण्यासाठी आले.


२० नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर सकाळी ८ वाजेपर्यंत पडद्यामागे अनेक गोष्टी घडल्या. आणि शरद पवार मात्र "आपल्याला काहीच ठाऊक नाही" असे दाखवत राहिले. पण तेच तर या सरकारचे खरे सूत्रधार होते. आणि या भाजप-राष्ट्रवादी सरकारचा अपेक्षित परिणाम झाला. आणि आपले सर्व मतभेद तात्पुरता बाजूला ठेवत शिवसेना आणि काँग्रेस वेगाने जवळ आले. आणि ठरल्याप्रमाणे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला आणि आघाडी सरकार बनले. या पक्षांत मतभेद इतके आहेत की आज यांचे खातेवाटप जरी झाले असले तरी मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला घ्यायचे यावर अनेक मतभेद आहेत. आणि या विस्तारात जागा न मिळालेल्या नाराज आमदारांना भाजप गळाला लावेल अशी भीतीही या आघाडीतील पक्षांना वाटत आहे. कदाचित याच मतभेदांमुळे काही दिवसात राष्ट्रवादी या सरकारच्या बाहेर पडेल आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करेल. पण नुकसान मात्र शिवसेना आणि कॉग्रेसचे होणार आहे कारण आपल्या विचारधारा सोडून हे पक्ष फक्त सत्तेसाठी एकत्र आलेत हे जनता पाहते आहे. आणि नुकत्याच झालेल्या कर्नाटक पोटनिवडणूक निकालावरून तर हे स्पष्ट होते कि मोठ्या पक्षाला बाजूला ठेऊन फक्त सत्तेसाठी इतर पक्षांची संधीसाधू आघाडी जनतेला मान्य होत नाही व मतदार अशा आघाडीला येणाऱ्या निवडणुकीत नक्की धडा शिकवतात.

13 December, 2019

मोदींनी कलम ३७० कसे हटवले?

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी अत्यंत हुशारीने आणि गुप्तपणे जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० कसे हटवले ते क्रमाक्रमाने आपण पाहू .


टप्पा १. 
मेहबूबा मुफ्ती सरकारकडून भाजपने पाठिंबा काढून घेणे. ही घटना सर्वात महत्वाची होती जेणेकरून कलम ३७० हटवण्याला संमती देण्याचे अधिकार राज्यशासनाकडून राज्यपालांना मिळतील. त्यानंतर विधानसभा बरखास्त केली. व राज्यशासनाचे कार्यकारी अधिकार राज्यपालास हस्तांतरित झाले. 


टप्पा २.
राष्ट्रपतींनी कलम ३५६ अंतर्गत अधिकारांचा वापर करून २०१८ मध्ये जम्मू-काश्मीर मध्ये राष्ट्रपती राजवट लावून विधानसभेचे कायदे करण्याचे अधिकार संसदेकडे हस्तांतरित केले.

टप्पा ३.
यास आणखी मान्यता मिळवण्याकरिता आणि सुप्रीम कोर्टाकडून पुढे कुठलीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी २०१८ मध्ये अनुसूचित जाती-जमाती दुरुस्ती विधेयक टप्पा २ मध्ये  सांगितलेले अधिकार वापरुन मंजूर करण्यात आले आणि अपेक्षेनुसार कोर्टाने कुठलीही अडचण निर्माण केली नाही.

टप्पा ४.
आता अनुसूचित जाती-जमाती दुरुस्ती विधेयकास मान्यता देण्यात आल्यामुळे राज्यपालांची सत्ता निर्विवाद होते. १९५२ च्या अधिसूचनेचा उपयोग करून, संविधानसभेचे अधिकार राज्य विधानसभेला हस्तांतरित केले गेले. (खाली दिलेल्या नोटिफिकेशनमधील शेवटचे कलम पहा.)
आणि राज्य विधानसभेची सत्ता २०१८ पासून राज्यपालांकडेच होती.


- जून २०१८ मध्ये बीजेपीने जम्मू-काश्मीरची सत्ता सोडल्यानंतर सापळा रचला. आणि जेव्हा राज्यपालांना  वाटले कि आता कोणताही पक्ष किंवा युती सत्ता स्थापन करू शकत नाही तेव्हा त्यांनी विधानसभा विसर्जित केली. खरी गोम विधानसभा विसर्जित करण्यातच होती. 




वरील सर्व परिस्थिती तयार होईपर्यंत वेळ वाया घालवण्यासाठीच भाजपने सरकार तयार केले होते.

सारांश - 
१. आवश्यक परिस्थितीसाठी वेळ वाया घालवण्यासाठीच भाजपने सरकार तयार करणे. 
२. राज्यपालांचे अधिकार वाढीसाठी सरकारचे समर्थन काढणे. 
3. विवादित विसर्जन आणि राष्ट्रपती राजवट 
४. राज्यपाल सशक्त करण्यासाठी कलाम ३५६ चा वापर.
५. अनुसूचित जाती-जमाती दुरुस्ती विधेयक वापरुन सुप्रीम कोर्टाची संमती. 
६. १९५२ चा अधिनियम वापरून राज्यपालांना विधानभेचे अधिकार 
७. आवश्यक परिस्तिथी तयार झाली. 

- जम्मू-काश्मीरचे त्रिविभाजन का केले नाही, हे सांगण्यासाठी राजा हरिसिंह यांनी स्वाक्षरी केलेल्या सामीलनामा करारात जम्मू-काश्मीरचा उल्लेख आहे. म्हणून पीओके परत भारतात सामील होईपर्यंत 'जम्मू-काश्मीर' हे राज्य अस्तित्वात असणे आवश्यक आहे.

- भविष्यकाळात जर भारत पीओकेचा दावा करणार असेल तर मग या सामीलनामा कराराची आवश्यकता असेल. कारण त्यात या जम्मू-काश्मीरचा उल्लेख आहे. 


- खरी परीक्षा सरकारमधून माघार घेण्याच्या वेळी होती. सार्वत्रिक निवडणुकीच्या अवघ्या एका वर्षापूर्वीच भाजपाने माघार घेतली. आता त्यांना निवडणूक आयोगाने निवडणुकांची तारीख जाहीर होईपर्यंत थांबावे लागले. परंतु जम्मू-काश्मीरमधील पक्षांनी हे होण्यापूर्वी युती केली असती तर जम्मू-काश्मीर मध्ये सरकार स्थापन झाले असते. आणि भाजपची अडचण झाली असती. पण येथे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मस्त घोळ घातला.

- या लवकर विघटनानंतर आणखी एक समस्या निर्माण झाली. आता लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकासोबत जम्मू-काश्मीरच्या निवडणुका होऊ शकत होत्या. पण गृहमंत्रालयाने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आणि निवडणुका लांबणीवर पडल्या. त्यामुळे सत्ता अजूनही राज्यपालांकडे होती.

- हा खेळ मेहबुबाला समजला होता तसेच उमर अब्दुल्ला यांनाही कळला होता म्हणून ते सारखे मोदी सरकारवर टीकाही करत होते.  


- परंतु निवडणूक आयोगानेही सरकारला अपेक्षित असे केले. जम्मू-काश्मीरच्या निवडणुका जाहीर केल्या नाहीत. आता, २०१९ लोकसभा निवडणुकीपर्यंत राज्यपालांच्या सत्तेला कोणताही धोका नव्हता.

- आता अनुसूचित जाती-जमाती दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी योग्य वेळ आली होती. अशा प्रकारे, राज्यपालांची शक्ती स्थापित केली. या विधेयकात राज्यपालांची संमती हीच विधानसभेची संमती आहे असे मानण्यात आले. सुप्रीम कोर्टानेही ते स्वीकारले. आता सरकारच्या प्रत्येक निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणारे न्यायिक कार्यकर्ते सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या पाठीमागे लागून या विधेयकाबाबत पुनर्विचार करायचा आग्रह करू शकत नव्हते. जर त्यांनी त्याचा पाठपुरावा केला असता तर ते दलित विरोधी मानले जातील अशी भीती होती. म्हणून ते गप्प बसले. एकदा त्यांनी अनुसूचित जाती-जमाती दुरुस्ती विधेयक स्वीकारल्यानंतर ते परत जाऊ शकत नाहीत. हे न्यायिक कार्यकर्ते खऱ्या 'चाणक्यशी' लढा देऊ शकत नाहीत.

- सरकार तयार करण्यापासून ते योग्य वेळी माघार घेण्यापर्यंत, राज्यपालांना त्यांची शक्ती वैध करण्यासाठी अनुसूचित जाती-जमाती दुरुस्ती विधेयकाचा वापर करण्यापर्यंत भाजपाने मीडिया, विरोधी पक्ष, न्यायपालिका आणि टीकाकारांचा पुरेपूर वापर करून घेतला. या सगळ्यामागील थिंक टँक पाहून मी खरोखरच चकित झालो. प्रत्येकजण जम्मू-काश्मीरच्या भविष्यच्या विषयी बोलत होता मात्र कॉंग्रेस आणि पीडीपीमध्ये भाजप फाटाफूट करीत होता. शक्य तितका उशीर युती होण्यासाठी करणे हे त्यांचे एकमेव उद्दीष्ट होते. जरी मेहबुबाला ओमरसोबत युती हवी होती, तरीही भाजपने त्यांची संख्या कमी असल्याचे निश्चित केले.


- भाजपचा आणखी गट ह्या युतीला उशीर करण्यासाठी कामाला लागला होता. 


- आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, कलम ३७० काढलं गेलेल नाही, तर ते शक्तीहीन बनविलं गेलं आहे. त्यामुळे कोणतीही घटनादुरुस्ती केली गेली नाही.

- सर्वात महत्वाची घटना 'गहाळ फॅक्स प्रकरण' ही होती. यामुळे कलम ३७० च्या शेवटावर  शिक्कामोर्तब झाले.


- भाजपने सरकार स्थापन केले नसते तर आमदाराची बंडखोरी अशक्य झाली असती. यामुळे त्यांना पीडीपी आणि एनसीमध्ये फूट पाडण्यास मदत झाली. भाजप-पीडीपी युतीसाठी लोकांनी त्यांना शिव्या दिल्या आजही देतात पण ते करणे किती आवश्यक होते हे आज कळते.

- १९५२ च्या अधिसूचनेबद्दल काही लोक विचारत आहेत. १९५२ मध्ये राष्ट्रपतींची अधिसूचना विधानसभा नसल्यामुळे राज्य विधानसभेच्या संमतीशिवाय घटनासमितीच्या सम्मतीने मंजूर करण्यात आला. हा एक अपवाद १९५२ मध्ये निर्माण केला गेला होता त्याचा आज मोदींनी उपयोग केला. आज घटना समिती अस्तित्वात नसल्याने तिचे अधिकार विधानसभेला आणि विधानसभाही  अस्तित्वात नसल्याने तिचे अधिकार थेट राज्यपालांना मिळाले. राज्यघटनेचे कलम ३५६ थेट जम्मू-काश्मीरला लागू होत नाही. त्यासाठी आधी जम्मू-काश्मीरच्या घटनेतील कलम ९२ च्या अंतर्गत राज्यपाल राजवट ६ महिन्यांकरीता लागू होते आणि नंतरच राष्ट्रपती राजवट लागू शकते.

- एकदा पीडीपी आणि एनसी दोघेही मोदी सरकारला राष्ट्रपती राजवट घोषित करण्यात रोखू शकले नाहीत, तेव्हा पाकिस्तान चित्रात दिसू लागला. मार्च मध्ये निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेपूर्वी कलम ३७० काढले गेले असते परंतु पुलवामा हल्ल्यामुळे मोदीजींना ते थांबवावे लागले.

- पाकिस्तानला दोन गोष्टींची अपेक्षा होती.


१. मोदीजी निवडणुकांबद्दल विचार करतील आणि पुलवामानंतरही कलम ३७० काढतील. पण त्यामुळे कलम ३७० काढण्याचे आंतरराष्ट्रीयकरण झाले असते. मोदीजींनी कलम ३७० संसदेचा वापर करून काढायचे ठरवले. जर मोदींनी तसे केले नसते तर पाकिस्तानला कलम ३७० काढण्याचे आंतरराष्ट्रीयकरण करण्यात यश आले असते.
काश्मीरमध्ये कोणत्याही सर्जिकल स्ट्राईकसाठी पाकिस्तान तयार होता पण बालाकोटला हवाई हल्ले झाले जे  पाकिस्तानला अपेक्षित नव्हते. मोदींनी पाक प्रदेशात जास्त खोलवर हल्ला करण्याची मोठी जोखीम पत्करली  जेणेकरुन पाक मागील वेळेप्रमाणे हे हल्ले नाकारू शकत नाही. भारत इतक्या खोलवर हल्ले करेल याचीही पाकिस्तानला अपेक्षा नव्हती.

२. पाकिस्तानची दुसरी अपेक्षा होती की मोदीजी ती पार करणार नाहीत. मागच्या वेळेपेक्षा मोदीजी कमी जागा जिंकतील अशी त्यांची अपेक्षा होती. होय, मोदीजी परत आले आणि त्याचबरोबर ते आणखी मोठा जनादेश घेऊन परत आले. मोदीजी कलम ३७० हटवणार आहेत हे पाकिस्तानला आधीच समजले होते पण वेळ घालवण्यापलीकडे दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हता. ते उशीर करण्यात यशस्वी ठरले पण ते आंतरराष्ट्रीयकरण करण्यात अपयशी ठरले. पाकिस्तानने कलम ३७० वाचवण्यासाठी मोठा राजकीय धोका पत्करला. परंतु त्याचा काही फायदा झाला नाही.


- राजकारणापेक्षा देशाला महत्व देण्याचा शहाणपणा मोदीजींनी केली. ५ ऑगस्ट रोजी, जेव्हा कलम ३७० काढून टाकले गेले, तेव्हा पाकिस्तानमध्ये ट्विटर युद्धाच्या जोरावर ते कोणतेही आंतरराष्ट्रीय प्रेस आकर्षित करू शकले नाहीत. मला वाटते हा सर्वात कठीण भाग होता. तो एक प्रचंड धोका होता, परंतु त्याचा फायदा देशाला झाला. सार्वत्रिक निवडणुकांसह जम्मू-काश्मीरच्या निवडणुकाही होतील अशी पाकिस्तानलाही अपेक्षा होती. परंतु बालाकोटच्या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांत तणाव इतका वाढला की ते अशक्य झाले.

- तर, लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेसह राष्ट्रपती राजवट काढून टाकण्याच्या प्रत्येक आशेचा मृत्यू झाला. मेहबूबा मुफ्ती अंतिम मुख्यमंत्री ठरल्या. ते विलंब करण्यास सक्षम होते परंतु त्या विलंबाने काही फायदा झाला नाही कारण मोदी केवळ सत्तेवर आलेच नाही तर राज्य विधानसभेच्या निवडणुकादेखील निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकल्या. तसेच, मोदीजी हटविण्यासह पुढे जाण्याच्या जाळ्यात अडकले नाहीत.

हा लेख @AayushNarayan3 यांच्या लेखाचे मराठी भाषांतर आहे 

12 December, 2019

महा'विकास'आघाडी की महा'स्थगिती'आघाडी

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असले तरी ह्या सरकारपुढील अडचणी कमी होण्याची कुठलीही  चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसले तरी भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत हे मतदारांनी दिले होते. परंतु "मुख्यमंत्री आमचाच" या एका मागणीमुळे शिवसेना महायुतीतून बाहेर पडली. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हवे असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न चालवले. परंत काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला एनडीए तून बाहेर पडण्याची अट घातल्यामुळे शिवसेना केंद्रातील एकमेव "अवजड" मंत्रिपदाचा राजीनामा देऊन एनडीए तूनही बाहेर पडली. पण शेवटी ह्या अभद्र आघाडीने सरकार स्थापन केले असले तरी प्रचंड वैचारिक मतभेद असल्यामुळे आघाडीत धुसफूस चालूच आहेत याची झलक पहिल्या काही दिवसातच आपल्याला पाहायला मिळाली. 

आघाडी सरकारला सत्तेत येऊन १५ दिवस झाले ठोस निर्णय घेता आलेला नाही. फडणवीस मुख्यमंत्री असताना  हे संवेदनशील नेते शेतकऱ्यांचा कळवळा दाखवत त्यांना नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी २५००० रु. ची मागणी सरकारकडे करत होते. परुंतु आज हेच नेते सत्तेत आल्यावर अजूनपर्यंत शेतकऱ्यांना कुठलीही मदत जाहीर न केल्यामुळे इतके असंवेदनशीन कसे झाले? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे. किंबहुना मुख्यमंत्रांना अजूनही खातेवाटप करून सरकारचा विस्तार करणे जमलेले नाही. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेले ६ मंत्रीही अजून बिनखात्याचे हिंडत आहेत. देशाच्या इतिहासात इतके दिवस एका सरकारमधले सर्व मंत्री बिनखात्याचे असण्याची हि पहिलीच वेळ आहे. पण प्रत्येक पक्षाला मलईदार खाते हवे असल्यामुळे ह्या पक्षांचे अजूनही एकमत झालेले नाही. त्यामुळे हे पक्ष अजूनही मंत्रिमंडळ विस्तार ताणून धरत आहेत. 

खातेवाटप झाले नसले तरी मुख्यमंत्री मात्र मागच्या भाजपसरकारच्या विकास प्रकल्पांना स्थगिती देण्याचा करंटेपणा करत सुटले आहेत. या सूडबुद्धीने काम करण्याच्या पद्धतीमुळे सरकार सर्वच विकास प्रकल्प तर स्थगित करणार नाहीना अशी भीती उद्योगजगताप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांना भेडसावू लागली आहे. यामुळे महाराष्ट्रात केलेली व भविष्यात येणारी गुंतवणूक याचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरे मधील मेट्रो कारशेड उभारणीला स्थगिती देणं हा असाच एक मूर्खपणाचा निर्णय सरकारने पहिल्याच दिवशी घेतला.


मुळात सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यामुळेच आरेतील झाडे तोडली गेली होती आणि मेट्रो कारशेड उभारणीचे काम सुरु झाले होते. जे आज २०-२५ % पूर्ण झालेले आहे. मेट्रो कारशेडला पर्यायी जागा उपलब्ध असली तरी ती खाजगी विकासकाची असल्याने ती जागा  विकत घ्यावी लागणार आहे त्यामुळे ५००० कोटी रु चा फटका हा सरकारला पर्यायाने जनतेलाच बसणार असल्याने भाजप सरकारने आरे या सरकारी जागेलाच मेट्रोकारशेड उभारणीस पसंती दिली होती आणि त्यातच मेट्रोचा फायदा होता. परंतु भाजप द्वेषाने ओतप्रोत भरलेल्या या सरकारला चांगली कामे दिसतात कुठे? त्यांना फक्त या विकासप्रकल्पांचे श्रेय भाजपला मिळू नये असेच वाटते. 


आपला कर्मदरिद्रीपणा लपवण्यासाठी आता मराठी माध्यमांमध्ये भाजपमधील जेष्ठ नेते नाराज आहेत अश्या बातम्या येत आहेत, पण या सत्ता संघर्षात आनंदराव अडसूळ, शिवाजीराव आढळराव-पाटील, चंद्रकांत खैरे, गजानन किर्तीकर यांसारखी शिवसेनेतील ज्येष्ठ मंडळी बाजूला पडल्यामुळे नाराज आहेत हि बातमी कुठेही दिसत नाही. तसेच भाजपसोबतची युती तुटल्यामुळे आता "भाजपची मदत नसेल तर पुढच्यावेळी लोकसभेत निवडून कसे जाणार?''असे प्रश्न अनेक सेना खासदारांना पडले आहेत. त्यामुळे तेही नाराज आहेत पण हि बातमीही तुम्हाला कुठे दिसणार नाही. आणि आपल्या मतदारसंघात भाजप सरकारने सुरु केलेल्या विकासकामांना आपल्या पक्षाचेच सरकार स्थगिती देत आहे यामुळेही हे खासदार नाराज आहेत आणि ते मुख्यमंत्र्यांवर विकासकामे स्थगित न करण्यासाठी दबाव आणत आहेत परंतु हि विकासकामे स्थगित करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते दबाव आणत आहेत. उद्धव ठाकरे मात्र दोन्हीकडून दबावाच्या विचित्र परिस्थितीत अडकले आहेत. त्यामुळे भाजप आमदार नाराज असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत.

11 December, 2019

द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत आणि सावरकर


द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत सावरकरांनी सांगितलं असा जावईशोध काँग्रेसने लावला आहे, हा त्यांचा दावा एकदम चूक आहे. मुस्लिम नेत्यांनी केलेल्या कार्यामुळे जातीयतावाद कसा निर्माण झाला याचे काही ऐतिहासिक संदर्भ बघणार आहोत.
- "हिंदू-मुस्लिम दोन राष्ट्र आहेत, एवढेच नाही तर ते विरोधी राष्ट्र आहे" असा विचार सय्यद अहमद खान यांनी सर्वप्रथम १६ मार्च १८८८ रोजी मेरठ येथे मांडला.
- तात्याराव तेव्हा ५ वर्षांचे होते.
- काँग्रेस हिंदूंचे नेतृत्व करते असे सांगत मुस्लिमांचे नेतृत्व करण्यासाठी ३० डिसेंबर १९०६ ला मुस्लिम लीगची स्थापना आगा खान यांच्या नेतृत्वात झाली. नवाब-उल-मुल्क याने मुस्लिम लीगची स्थापना हिंदूंपासून वाचण्यासाठी झाली असे अलिगढ येथे भाषणात म्हटले होते
- तात्याराव तेव्हा लंडनला होते.
- 'सारे जहाँ से अच्छा' म्हणणारा कवी महंमद इकबाल याने १९३० च्या मुस्लिम लीगच्या अलाहाबाद अधिवेशनात, "हिंदू-मुस्लिम कधीही एकत्र राहू शकत नाही म्हणून मुसलमानांना एक स्वतंत्र देश असावा" अशी मागणी केली.
- तात्याराव तेव्हा रत्नागिरीत स्थानबद्ध होते. त्यांना राजकारण करायला बंदी होती.
- मुस्लिमांसाठी स्वतःचा देश असण्याची कल्पना केम्ब्रिज मध्ये शिकत असलेल्या रहमत अली चौधरींची होती. १९३३ मध्ये त्याने पंजाब, वायव्य सरहद्द, काश्मीर, सिंध आणि बलुचिस्तान मिळून एक स्वतंत्र देश व्हावा व त्याचे नाव पाकिस्तान असावे अशी मागणी केली. 
- तात्याराव तेव्हाही स्थानबद्ध होते.
- ह्या सर्व घडामोडी तात्याराव पाहत होते. ते वारंवार काँग्रेस नेत्यांना इशारा देत होते कि, "मुस्लिम लीगची स्वतंत्र देशाची मागणी हिंदुस्थानचे तुकडे करेल, तुम्ही वेळीच सावध व्हा पण काँग्रेसच्या फक्त मुसलमानांना खुश ठेवण्याच्या धोरणामुळे नाराज असलेले सावरकर १९३८ मध्ये हिंदू महासभेचे अध्यक्ष निवडले गेले आणि त्यांनी 'हिंदू राष्ट्र' ची गर्जना केली. त्यात त्यांचे म्हणणे होते कि, "ह्या देशाला मातृभूमी मानणाऱ्यांचा हा देश आहे. अल्पसंख्याकांनी अल्पसंख्याकांसारखे राहावे." अर्थात हा देश हिंदूंचा असला तरी इतरांना इथे न्याय मिळेल. त्यासाठी 'एक व्यक्ती एक मत' या तत्वाचा पुरस्कार केला.
- या हिंदू महासभेच्या मागण्यांमुळे जातीयवाद वाढला असे काँग्रेस म्हणते. पण नंतरचा इतिहास पाहता सावरकरांना त्यासाठी दोषी धरणे योग्य नाही. परिस्थितीचे दडपण आल्यामुळे काँग्रेसने फाळणी स्वीकारली हे सत्य आहे. हिंदूंचं देश यावर कोणाचेही दुमत असू नये.
- तरीही मुस्लिमांना पाकिस्तान दिला ह्यामागे भारतातल्या हिंदूंना स्वतंत्र जीवन जगता यावे हि भावना होती. पण पाकिस्तान घेऊनही आज काश्मीर आणि अन्य भागांसाठी त्यांची घुसखोरी चालूच आहे. कत्लेआम चालू आहे. त्यामुळे ८० वर्षांपूर्वी सावरकर जे सांगत होते, "हा देश हिंदूंचा आहे" हे आता ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. आणि आनंद याचा आहे कि मोदींच्या नेतृत्वात कट्टर सावरकरवादी अमित शहा याच दिशेने वेगाने मार्गक्रमण करत आहेत.

06 December, 2019

आर्थिक मंदी रोखण्याच्या मोदींच्या रणनीतीबद्दल माझे मत


         जर भारत ग्लोबल पॉवर बनू इच्छित असेल आणि अमेरिका आणि चीनशी स्पर्धा करू शकला असेल तर पुढील 10 वर्षांत आपण नाममात्र जीडीपी वाढीच्या 12% दराने वाढण्याची गरज आहे. तरच आपण मध्यम उत्पन्न असणारा देश होऊ शकतो आणि जागतिक शक्तींशी स्पर्धा करू शकतो. तसे होण्यासाठी आपल्याला अनेक गंभीर संरचनात्मक सुधारणांची आवश्यकता आहे.
मोदींचा पहिला कार्यकाळ समाजवादी आर्थिक धोरणांविषयी होता. जीएसटी (समस्या असूनही), आयबीसी आणि प्रमुख इन्फ्रा बूस्ट वगळता मोदींची सर्व धोरणे मुद्रा, प्रसाधनगृह, गृहनिर्माण, आयुष्यमान आणि पीएमकिसन या निसर्गात डाव्या विचारांचे होते. परंतु मोदी नि: शुल्क बाजार भांडवलदार आहेत. जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा ते म्हणत की, "भारताला विकसित होण्यासाठी अनेक गंभीर संरचनात्मक सुधारणांची आवश्यकता आहे." मोदींचा पहिला कार्यकाळ समाजवादी आर्थिक धोरणांविषयी होता. जीएसटी वगळता (समस्या असूनही), आयबीसी आणि प्रमुख इन्फ्रा बूस्ट वगळता मोदींची सर्व धोरणे मुद्रा, प्रसाधनगृह, गृहनिर्माण, आयुष्यमान आणि पीएमकिसन यांच्यासारख्या डाव्या विचारसरणीच्या होत्या. पण स्वभावानुसार मोदी हे एक मुक्त बाजार भांडवलदार आहेत. जेव्हा ते मुख्यमंत्री होते, ते ओपिनली म्हणायचे, "पीएसयू का जनम मरने के लिए है होता है".  ते भांडवलदारासारखे आले. पण त्यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात समाजवादीसारखे मार्गक्रमण केले.

परंतु मी खात्रीने सांगू शकतो की त्यांचा पहिला कार्यकाळ खात्रीसाठी होता की ते दुसर्‍या टर्मसाठी पुन्हा सत्तेवर येतील. मोदींना माहित आहे की पब्लिक माइंडसेट निसर्गतः समाजवादी आहे. लोकांचे मत संशयासह सुधारणांकडे आहे. काही लोक #SaveBPCL #SaveAirIndia हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. तसेच बुलेट ट्रेनला होणारा विरोध पहा. मूलभूत आर्थिक जागरूकता नसल्यामुळे सामान्य लोक खासगीकरण, एफडीआय वगैरेला विरोध करतात. मोदी वाजपेयींच्या चुकांवरून शिकले. त्यांनी भाजपला आणि देशाला २०१९ मध्ये २००४ सारख्या परिस्थितीपासून वाचवले आणि समाजवादी धोरणांद्वारे त्यांनी कायमस्वरुपी भाजपाची व्होटबँक तयार करण्यावर भर दिला. त्यांच्या समाजवादी योजनांचे लाभार्थी आता भाजपाचे कायम मतदार आहेत. हे मतदार आता पुढच्या दहा वर्षांत किमान विरोधी पक्षाच्या प्रचारामुळे प्रभावित होणार नाहीत.

आता दुसऱ्या कार्यकाळात मोदींनी २०२५ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर जीडीपीचे आणि २०३० पर्यंत १० ट्रिलियन डॉलर जीडीपीचे  लक्ष्य ठेवले आहे. याचा अर्थ असा की नाममात्र जीडीपी वाढीचा दर १४% असेल (चलनवाढीचा दर < ६ टक्के राहील आणि एक्सचेंज रेटमध्ये कोणताही बदल होणार नाही असे गृहीत धरले आहे). तसे होण्यासाठी आपल्याला फ्री मार्केट कॅपिटलिझमच्या दिशेने मोठे बदल होणे आवश्यक आहे. बीपीसीएल आणि एअर इंडियाच्या खासगीकरणाच्या निर्णयापर्यंत आणि कॉर्पोरेट टॅक्स कट निर्णयापर्यंत ते साध्य होण्याची आशा नव्हती. परंतु आता असे दिसते की मोदी सरकार हे कडू औषध पिण्यास तयार आहे. आता, खालील सुधारणेचे अनुसरण करणे आवश्यक आहे -

१. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे सरकारीकरण - एसबीआय सोडून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील सरकारी भागभांडवल ३०% पर्यंत कमी करा. १९९७ पासून अनेक तज्ज्ञ समितीच्या अहवालांनी हे सुचवले आहे. यशवंत सिन्हा आणि चिदंबरम दोघांनीही असे काही प्रसंगी सांगितले होते की आम्हाला ते करायला आवडेल पण तसे करण्यास आमच्याकडे बहुमत नाही.

२. सर्व नॉन स्ट्रॅटेजिक पीएसयूचे खाजगीकरण व्यवसाय करणे हा सरकारचा व्यवसाय नाही. हिंदीमध्ये एक म्हण आहे - ' जहाँ राजा व्यापारी, वहाँ प्रजा भिकारी'. या पांढऱ्या हत्तींपासून सुटका करणे चांगले.

३. भूमि अधिग्रहण सुधारणांचा मोदींनी २०१४ मध्ये प्रारंभी प्रयत्न केला, पण २०१५ मध्ये “सूट बूट की सरकारच्या” विरोधकांच्या टीकेनंतर आणि दिल्ली आणि बिहार विधानसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर त्यांनी हे सोडून दिले.

४. नेमणे आणि हटवणे धोरणासह कामगार सुधारणा.

५. कृषी सुधारणे म्हणजे एपीएमसी भंगार करून कृषी बाजारपेठा मोकळे करणे.

६. औद्योगिक कर कमी करण्यासह प्रत्यक्ष कर संहिता. याने Supply Side ला प्रोत्साहन दिले जाते. Dimand Side ला बूस्ट देण्यासाठी आता आम्हाला वैयक्तिक आयकर दर कमी करण्याची आवश्यकता आहे. डीटीसी त्याची काळजी घेईल.

७. जीएसटी प्रक्रियेचे सरलीकरण (६०% काम प्रलंबित) आणि जीएसटी दरांचे तर्कसंगतकरण.

८. निर्यातीला चालना देण्यासाठी व्यवसाय अनुकूल देशांसह मुक्त व्यापार करार.

९. पायाभूत सुविधांना अतिरिक्त मेजर बूस्ट.

१०. न्यायिक सुधारणा. इत्यादी

निराकरणे नवीन नाहीत. पण अंमलबजावणी ही समस्या आहे. हे सर्व उपाय अँटी फार्मर्स, अँटी कॉमन मॅन, अँटी स्मॉल बिझिनेस म्हणून समजले जातात. लोक यास श्रीमंत लोकांकडे देश विक्री म्हणून संबोधतात.

बहुतेक सुधारवादी प्रधानमंत्री PV नरसिंहराव आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी अर्थव्यवस्थेत अत्यंत चांगल्या सुधारणा करत असूनही निवडणुका गमावल्या. त्यावेळी PV नरसिंहराव यांच्यावरही देश विकल्याचा आरोप होता. प्रत्येकाला माहित आहे की हे करणे आवश्यक आहे परंतु जनतेच्या प्रतिक्रियेच्या भीतीने राजकारणी हे करण्यास घाबरत होते. पण मोदींनी लक्ष्य ठेवले होते. म्हणून, त्यांनी ते करणे आवश्यक आहे. त्याला सुधारणेची कल्पना देशाला विकायची आहे. हे करणे आवश्यकी आहे हे त्यांनी लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे. नोटबंदीही त्यांनी याच मार्गाने केली. याच मार्गाने ते अर्थव्यवस्थेत सुधारणा करू शकतात. ज्याला खूप जास्त लोकांची मान्यता आणि विश्वासार्हता आहे. तोच ह्या सुधारणा करू शकतो.

मोदींनी सत्ता आल्यानंतर लगेचच कलम ३७० का रद्द केला आणि २०२३ मध्ये का नाही? १ वर्षात हे सर्व राम मंदिर, UCC, NRC, CAB, लोकसंख्या नियंत्रण कायदा का? २०२४ च्या निवडणुका जिंकण्यासाठी या सर्व बाबींवर वर्षभरापूर्वी कारवाई केली गेली असती. परंतु हे मुद्दे आता हाती घेण्यात आले आहेत. या मुद्द्यांमुळे राजकीय भांडवल आवश्यक आहे. या समस्येमुळे, लोक सुधारणांकडे दुर्लक्ष करणार नाहीत. या भावनिक मुद्द्यांमुळे, राजकीय भांडवलामुळे राजकीय नुकसानीचे प्रमाण कमी होईल. मोदी हुशार आहेत. त्यांना हे माहित आहे.

सध्याचे मोदी सरकार कॉर्पोरेटसारखे काम करीत आहे जिथे मोदी पूर्णपणे अर्थव्यवस्था व सुधारणांवर भाग घेतील. आणि अमित शहा भावनिक मुद्द्यांचा सामना करतील आणि राजकीय भांडवल निर्माण करतील. सुधारणेची कल्पना विकण्यासाठी आपल्यास एक संकट असणे आवश्यक आहे. संकटाशिवाय तुम्ही मतदारांना सुधारणे विकू शकत नाही. म्हणूनच मोदी गप्प आहेत आणि संकट आणखी वाढवू देतात जेणेकरुन 'आपत्ती निवारण'च्या नावाखाली या सर्व सुधारणांची विक्री होऊ शकेल. माझ्या प्रामाणिक मते, सध्याचे संकट हे सर्व सुधारणांचे औचित्य सिद्ध करण्यासाठी मोदी सरकारचे स्वत: नेच निर्माण केलेले संकट आहे. मोदी जाणीवपूर्वक स्वतःवर अर्थव्यवस्थेबाबत टीका होऊ देत आहेत. विरोधकांना आणि ट्रोल्सना, मोदींना अर्थव्यवस्थेबद्दल काही समजत नाही असे सांगू देत आहेत, त्यांच्या सरकारची चेष्टा करू देत आहेत. परंतु त्याच्याकडे बॅकअप योजना आणि सुधारणांचे ब्लू प्रिंट आहे. त्यासाठी त्यांनी एक टीम कामाला लावली आहे. माझ्यामते अरविंद पंगारिया, ए. विरमणी, जगदीश भगवती, सुरजित भल्ला हे पडद्यामागे मोदींसाठी काम करत आहेत. हे त्या टीमचे सदस्य कदाचित अधिकृत नसतील. 

मला वाटते/आशा आहे की मोदी सरकार 'Soviet scorched Earth tactic ' चा वापर भारतीय अर्थव्यवस्थेबाबत करीत आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये सोव्हिएत युनियनने जवळजवळ ६ महिने प्रचंड माघार घेतली आणि सोव्हिएत प्रांतातील वेह्रमॅक्टपर्यंत प्रचंड भूमी स्वीकारली. माघार घेताना सोव्हिएत युनियनने त्यांची स्वतःची पिके, घरे, निवारा, कारखाने, रेल्वे मार्ग, मुळात अक्षरशः सर्व काही जाळले. म्हणून, बर्लिन ते कुर्स्क पर्यंत पुरवठा लाइन राखणे अशक्य होते, आणि एकदा हिवाळा आला की, वेहरमॅच्टला चिखल व बर्फाचे ढिगारे साठवण्यात आले, त्याच क्षणी स्टालिनने हिवाळी हल्ले सुरू केले आणि युद्धाची दिशा बदलली.

माझ्यामते भारतीय अर्थव्यवस्थेबाबतही तेच घडेल. २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीत "कोणताही पर्याय उपलब्ध नाही. (TINA Factor)" असे सांगून भारतात मुक्त अर्थव्यवस्थेची सुरुवात होईल. म्हणूनच मोदी अर्थव्यवस्था कोलमडू देत आहेत आणि मला वाटते की हे काम या महिन्यापर्यंत राहील.. काही दिवसात पंतप्रधानांना ८ नोव्हेंबर २०१६ सारखे देशाला संबोधित करणाऱ्या भाषणाची अपेक्षा करू शकतो. जर आपल्याला २०२५ पर्यंत आपली ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करायची असल्यास अशा प्रकारच्या किमान काही सुधारणांची घोषणा करण्याची शेवटची तारीख १ फेब्रुवारी २०२०, अर्थसंकल्प दिवस ही आहे. माझ्यामते, मोदींनी इतर उपायांसह बँकांचे खासगीकरण जाहीर करावे.

२३ डिसेंबर २०१९ रोजी PV नरसिंहराव यांची पुण्यतिथी आहे. त्याचदिवशी त्यांना आदरांजली देतांना मोदी त्यांना श्रद्धांजली म्हणून भारतरत्न जाहीर करतील. ज्याप्रमाणे मोदींनी गांधी व सरदार पटेल यांचा वारसा कॉंग्रेसचाकडून हिसकावून घेतला आहे त्याचप्रमाणे मोदी कॉंग्रेसमधील PV नरसिंहराव यांचा वारसा हिसकावून घेतील. म्हणून, १ फेब्रुवारी २०२० रोजी किंवा त्यापूर्वी मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा जाहीर होण्याची अपेक्षा आहे. कम्युनिस्ट कामगार संघटना, व्यापारी संघ, बँक संघटना, शेतकरी संघटना इत्यादींकडून मोठ्या प्रमाणात आवाज ऐकू येईल. बंद, मोर्चा, निदर्शने, रास्तारोकोसाठी कदाचित ते रस्त्यावर येतील. पण भाजपच्या सर्व समर्थकांना अशी विनंती आहे की तुम्ही अशा सरकारच्या सर्व उपाययोजनांची माहिती नातेवाईक, मित्र, सहकारी इत्यादींना द्या. त्यांना या सुधारणांच्या अनुकूल करा. २०२०-२१ या वर्षात भाजपला अल्प मुदतीचा राजकीय किंमत मोजावी लागणार आहे. परंतु २०२२ नंतरच्या काळात मोठा राजकीय फायदा भाजपाला होणार आहे.

हा लेख @accountantvarun यांच्या लेखाचे  मराठी भाषांतर आहे.