द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत सावरकरांनी सांगितलं असा जावईशोध काँग्रेसने लावला आहे, हा त्यांचा दावा एकदम चूक आहे. मुस्लिम नेत्यांनी केलेल्या कार्यामुळे जातीयतावाद कसा निर्माण झाला याचे काही ऐतिहासिक संदर्भ बघणार आहोत.
- "हिंदू-मुस्लिम दोन राष्ट्र आहेत, एवढेच नाही तर ते विरोधी राष्ट्र आहे" असा विचार सय्यद अहमद खान यांनी सर्वप्रथम १६ मार्च १८८८ रोजी मेरठ येथे मांडला.
- तात्याराव तेव्हा ५ वर्षांचे होते.
- काँग्रेस हिंदूंचे नेतृत्व करते असे सांगत मुस्लिमांचे नेतृत्व करण्यासाठी ३० डिसेंबर १९०६ ला मुस्लिम लीगची स्थापना आगा खान यांच्या नेतृत्वात झाली. नवाब-उल-मुल्क याने मुस्लिम लीगची स्थापना हिंदूंपासून वाचण्यासाठी झाली असे अलिगढ येथे भाषणात म्हटले होते
- तात्याराव तेव्हा लंडनला होते.
- 'सारे जहाँ से अच्छा' म्हणणारा कवी महंमद इकबाल याने १९३० च्या मुस्लिम लीगच्या अलाहाबाद अधिवेशनात, "हिंदू-मुस्लिम कधीही एकत्र राहू शकत नाही म्हणून मुसलमानांना एक स्वतंत्र देश असावा" अशी मागणी केली.
- तात्याराव तेव्हा रत्नागिरीत स्थानबद्ध होते. त्यांना राजकारण करायला बंदी होती.
- मुस्लिमांसाठी स्वतःचा देश असण्याची कल्पना केम्ब्रिज मध्ये शिकत असलेल्या रहमत अली चौधरींची होती. १९३३ मध्ये त्याने पंजाब, वायव्य सरहद्द, काश्मीर, सिंध आणि बलुचिस्तान मिळून एक स्वतंत्र देश व्हावा व त्याचे नाव पाकिस्तान असावे अशी मागणी केली.
- तात्याराव तेव्हाही स्थानबद्ध होते.
- ह्या सर्व घडामोडी तात्याराव पाहत होते. ते वारंवार काँग्रेस नेत्यांना इशारा देत होते कि, "मुस्लिम लीगची स्वतंत्र देशाची मागणी हिंदुस्थानचे तुकडे करेल, तुम्ही वेळीच सावध व्हा पण काँग्रेसच्या फक्त मुसलमानांना खुश ठेवण्याच्या धोरणामुळे नाराज असलेले सावरकर १९३८ मध्ये हिंदू महासभेचे अध्यक्ष निवडले गेले आणि त्यांनी 'हिंदू राष्ट्र' ची गर्जना केली. त्यात त्यांचे म्हणणे होते कि, "ह्या देशाला मातृभूमी मानणाऱ्यांचा हा देश आहे. अल्पसंख्याकांनी अल्पसंख्याकांसारखे राहावे." अर्थात हा देश हिंदूंचा असला तरी इतरांना इथे न्याय मिळेल. त्यासाठी 'एक व्यक्ती एक मत' या तत्वाचा पुरस्कार केला.
- या हिंदू महासभेच्या मागण्यांमुळे जातीयवाद वाढला असे काँग्रेस म्हणते. पण नंतरचा इतिहास पाहता सावरकरांना त्यासाठी दोषी धरणे योग्य नाही. परिस्थितीचे दडपण आल्यामुळे काँग्रेसने फाळणी स्वीकारली हे सत्य आहे. हिंदूंचं देश यावर कोणाचेही दुमत असू नये.
- तरीही मुस्लिमांना पाकिस्तान दिला ह्यामागे भारतातल्या हिंदूंना स्वतंत्र जीवन जगता यावे हि भावना होती. पण पाकिस्तान घेऊनही आज काश्मीर आणि अन्य भागांसाठी त्यांची घुसखोरी चालूच आहे. कत्लेआम चालू आहे. त्यामुळे ८० वर्षांपूर्वी सावरकर जे सांगत होते, "हा देश हिंदूंचा आहे" हे आता ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. आणि आनंद याचा आहे कि मोदींच्या नेतृत्वात कट्टर सावरकरवादी अमित शहा याच दिशेने वेगाने मार्गक्रमण करत आहेत.

योग्यवेळी केलेले सत्य इतिहास कथन!धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत.
ReplyDeleteधन्यवाद. ब्लॉग नक्की शेयर करा.
Deleteहे खरोखरच भारताच भाग्य आहे की ऐन कडेलोटाची वेळ उद्भवली त्या वेळी मोदींकडे देशाचे नेतृत्व आले आणि सर्व बेस तयार करून दुसऱ्या टर्ममध्ये तेथे अमित शहांना गृहमंत्री म्हणून आणले! देशातील राजकारणात विश्वनाथन् आनंद!
Deleteहि कामे करण्यासाठी दुसरी टर्म मिळावी हेच उद्दिष्ट समोर ठेऊन पहिल्या काळात मोदींनी लोककल्याण योजना राबवल्या.
Delete